Dehu : संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज, प्रसिद्ध व्याख्याते शिरीष महाराज मोरे यांचे आकस्मिक निधन

निगडी (प्रतिनिधी): संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज व प्रसिध्द व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांचे आज (दि.5 फेब्रुवारी) राहत्या आकस्मिक निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रखर हिंदूत्ववादी विचारवंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप शिरीष महाराज मोरे यांच्या अशा अकाली जाण्याने त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.


प्राप्त माहितीनुसार, शिरीष महाराज मोरे यांचे बुधवारी (दि.5) सकाळी राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजलेले नाही. पोलीस तपासाअंती सर्व चित्र स्पष्ट होईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. दरम्यान, हे वृत्त कळताच देहू परिसरात शोककळा पसरली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शिवव्याख्याते म्हणून शिरीष मोरे यांचा मोठा लौकीक होता. नुकताच त्यांचा विवाह देखील ठरला होता व कुंकूमतिलक समारंभ देखील झाला होता. असे असताना त्यांच्या अशा अचानक निधनाच्या वृत्ताने सर्वत्र खळबळ माजली आहे.
प्रखर हिंदूत्ववादी विचारक
“ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे आवाहन शिरीष महाराज मोरे यांनी करीत आपल्या प्रखर हिंदूत्ववादी विचारांची जाणीव करून दिली होते. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करीत असत.