गावगाथाठळक बातम्या

Pune MSEB : पुणेकरांनो, इकडे लक्ष द्या..! पुण्यात गुरुवारी तब्बल आठ तासांसाठी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद…

पुणे (प्रतिनिधी): पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी हाती आली आहे. गुरुवारी (6 फेब्रुवारी 2025) पुण्यातील काही भागातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे मेट्रो आणि महापारेषण यांच्या अत्यावश्यक कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

किती वेळ वीज पुरवठा बंद?

पुणे मेट्रो आणि महापारेषणच्या अतिउच्चदाब वीज वाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी महापारेषणच्या तीन अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी (6 फेब्रुवारी) सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे काम सुरू असल्याने या काळात वीज पुरवठा बंद राहणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गावरील महापारेषणच्या 132 केव्ही भूमिगत वीज वाहिन्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी 220 / 132 केव्ही गणेशखिंड आणि चिंचवड अतिउच्चदाब उपकेंद्र तसेच खोथरूड येथील जीकेआरएस उपकेंद्राचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

कोणत्या भागातील वीज पुरवठा बंद राहणार?

गणेशखिंड, मॉडेल कॉलनी, दीप बंगला परिसर, वडारवाडी, गोखलेनगर, जनता वसाहत, एमआयजी कॉलनी, वैदूवाडी, जनवाडी, वेताळबाबा चौक, मंगलवाडी, सेनापती बापट मार्ग, रमणबाग चौक, न्यू मराठी स्कूल, नारायणपेठ, शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रोड, रोकडोबा मंदिर परिसर, लक्ष्मी रोड, कुमठेकर चौक, पोलीस लाईन वसाहत, घोले रोड, मॉडर्न कॉलेज, विजय टॉकीज, रेवेन्यू कॉलनी, सिमला ऑफीस, आकाशवाणी, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, मेट्रो स्टेशन, संचेती हॉस्पिटल, ठुबे पार्क, औंध गाव, सिद्धार्थ नगर, परिहार चौक, ब्रेमेन चौक, संघवी रोड, ओम सुपर मार्केट, थोरात चौक, वाकडेवाडी, साखर संकुल रोड, चाफेकरनगर, आकाशवाणी कॉलनी, राहुल थिएटर, खैरेवाडी, दळवी हॉस्पिटल, अशोकनगर, रेंज हिल्स रोड, काकडे मॉल, एबीआयएल, मोदीबाग, चव्हाणनगर तसेच आपटे रोड, रुपाली गल्ली, शिरोळे रोड, घोले रोड, पुलाची वाडी, संभाजी गार्डन, एफसी रोड, वैशाली हॉटेल, सुतारदरा, शिवतिर्थनगर, साम्राज्यनगर, शिक्षकनगर, जयभवानीनगर, किष्किंधानगर परिसरातील वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button