विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे: मल्लिनाथ कल्याणशेट्टी अक्कलकोट:
10 वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम

विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे: मल्लिनाथ कल्याणशेट्टी

अक्कलकोट:

10 वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम

विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षण घेऊन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे मत संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक विद्यालय,अक्कलकोट येथे आयोजित केलेल्या इयत्ता 10 वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी संस्थेच्या संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, ज्युनियर कॉलेज प्रमुख पूनम कोकळगी, संस्थेच्या सीईओ सौ रुपाली शहा, सीनियर कॉलेज प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, प्रशालेचे मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, उच्चशिक्षणात खूप स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत उतरण्यासाठी खूप कष्ट व मेहनत करावी लागते. कॉपीमुक्त परीक्षा देऊन, अभ्यास करून विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे.

प्रास्ताविक विद्यार्थिनी वेदांती मसलेकर यानी केले. यानंतर नुकतेच जेईई मेन परीक्षेत 97.3 पर्सन्टाईल मिळवलेला विद्यार्थी प्रतिक भरमशेट्टी यानी अभ्यास कसे करावे याबाबत विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व मान्यवरानी प्रतिक भरमशेट्टी याचे कौतुक करून यथोचित सत्कार केले.
शुभांगी पाटील,मयुरी हळगोदे ,श्रेया बिराजदार,साक्षी टोणपे ,महेश्वर स्वामी, साक्षी बिराजदार,कृष्णा फुलारी या विद्यार्थ्यांनी अध्यापन केलेल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केले. कल्पना स्वामी, पूनम कोकळगी व शांभवी कल्याणशेट्टी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक सूर्यकांत रूगे, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप, राजकुमार गवळी, मनिषा दूधभाते, सागर मठदेवरु, निशिगंधा कोळी, विद्या बिराजदार, कुमार जाधव, शरणबसप्पा चानकोटे,दिपक गंगौंडा, सिद्रामप्पा पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.
सूत्रसंचालन मयुरी हळगोदे व पूजा बंदीछोडे यानी केले तर उपस्थितांचे आभार कु शुभांगी पाटील यानी मानले.