बोरी उमरगे येथे अनादी काळापासून चालत आलेली श्री लक्ष्मी थंडी यात्रा भाकणुक कार्यक्रम मंगळवार दि.१८ फेब्रुवारी २५ रोजी होणार आहे.
यात्रा विशेष

अक्कलकोट दि.१५ फेब्रुवारी
तालुक्यातील बोरी उमरगे येथे अनादी काळापासून चालत आलेली श्री लक्ष्मी थंडी यात्रा भाकणुक कार्यक्रम मंगळवार दि.१८ फेब्रुवारी २५ रोजी होणार आहे.
अनादी काळापासून चालत आलेली श्री लक्ष्मी माता थंडी यात्रा भाकणुक आज पर्यंत तंतोतंत खरे ठरले असल्याने महारष्ट्र कर्नाटक सीमा भागातील कलबुर्गी,विजापूर,धाराशिव, सोलापूर आदी जिल्ह्यातून शेतकरी,भाविक भक्त येथे मोठ्या संख्येने गर्दी करतात. मंगळवार दि. १८ रोजी रात्री ९ वाजता बोरी उमरगे येथील श्रीक्षेत्र लक्ष्मी मंदिर, दोड्डे लक्ष्मी मंदिर व डोंगर लक्ष्मी मंदिराचे कलशारोहण कार्यक्रम करण्यात येणार असून रात्री अकरा वाजता गावातून श्री लक्ष्मी माता पालखीचे भव्य मिरवणूक सोहळा होणार आहे.यानांतर रात्री बारा नंतर उमरगे येथून श्री लक्ष्मी माता पालखीचे मिरवणूक सोहळा डोंगर लक्ष्मी मंदिर कडे प्रयाण होणार आहे.डोंगर लक्ष्मी मंदिर येथे रात्री एक दीडच्या सुमारास भाकणुकीस सूरवात होणार असून शेती पीक पाणी पाऊस रोग राई व राजकीय घडामोडी बद्दल भाकणुक सांगितले जाते.या भाकणुकी नुसार महारष्ट्र कर्नाटक सीमा भागातील शेतकरी वर्षभरातील आपल्या शेतीचे पीक पाणी मशागत बद्दल नियोजन करतात. या यात्राचा उमरगे, मैंदर्गी, मिरजगी, रामपूर, हत्तीकणबस कंठेहल्ली, संगोळगी (आ) चिक्केहल्ली या पंचक्रोशीतील भाविक भक्तच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आले आहे.मंगळवार दि.१८ रोजी डोंगर लक्ष्मी मंदिर येथे रात्रभर महाप्रसादची व्यवस्था करण्यात आले असून भाविक भक्तांनी उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादची आवाश्य लाभ घ्यावा असे आवाहन पंच कमिटी वतीने करण्यात आला आहे.
