गावगाथा

छत्रपती शिवाजी महाराज हे उत्कृष्ट भूराज नीतिकार : डॉ. शिवराय आडवीतोट

शिवजयंती विशेष २०२५

छत्रपती शिवाजी महाराज हे उत्कृष्ट भूराज नीतिकार : डॉ. शिवराय आडवीतोट

HTML img Tag Simply Easy Learning    

संपूर्ण जगाला आदर्श राज्य व्यवस्था कशी असावी याचा मूर्तीमंत आदर्श घालून देणारा रयतेचा राजा म्हणून ज्याची ख्याती संपूर्ण जगाला आहे असे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज हे भौगोलिक ज्ञानाचे उत्कृष्ट जाणते होते यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आलेला आहे.
युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांची भौगोलिक ज्ञानाचा उपयोजित दृष्टिकोन समजून घेणे हे आजच्या भूगोल विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, संशोधकांना अत्यंत आवश्यक आहे. कारण असे म्हटले जाते, भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचे नाट्य घडत असते. भूगोलाच्या अभ्यासामध्ये भौगोलिक घडामोडींचा आणि घटकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असते. भौगोलिक घटकांचा वापर प्रत्यक्ष युद्धनीतीमध्ये राजकारणामध्ये कसे करण्यात यावे हे शिकण्याकरता राजांचा भौगोलिक दृष्टिकोन व त्यांची युद्धनीती समजून घेणे याप्रसंगी यथोचित ठरेल. राजेंनी बांधलेले गड,किल्ल्यांचा अभ्यास केला असता त्यांनी निवडलेले स्थान, त्या किल्ल्यांच्या अवतीभवतीचा परिसर कोणत्याही भूराजनीतिक अभ्यासकाला आव्हानात्मक वाटते. राजेंचा अभ्यास ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक दृष्टी कोनातून अनेक अंगाने झालेले आहे. पण महाराजांना असलेले भौगोलिक ज्ञान व त्यांचा प्रत्यक्ष वापर आपल्या युद्धनीतीमध्ये कसा केलेला आहे यावर फारसा अभ्यास झालेला नाही. आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्रत्येक विषयामध्ये उपयोजित ज्ञानावर भर देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भारतीय ज्ञान परंपरा प्रणालीच्या माध्यमातून उत्तम असे ऐतिहासिक ज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना होण्याकरिता नवीन अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे.
भू विज्ञानातील महत्त्वपूर्ण शाखांपैकी ऐतिहासिक भूगोल व राजकीय भूगोल हे महत्त्वपूर्ण शाखा असून त्यामध्ये काळाच्या ओघात भौगोलिक घटना कसे बदलत असतात व त्याबद्दल त्या पद्धतीचा अभ्यास ऐतिहासिक भूगोलामध्ये केले जाते. तत्कालीन परिस्थितीमध्ये या घटकांचा वापर राजनीतिक अभ्यासाकारने कसे केलेले आहेत हे भूराजनीती मध्ये केला जातो. आपल्या देशामध्ये ऐतिहासिक भूगोल राजकीय भूगोलाचा अभ्यास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. या उलट पश्चिमात्य देशांमध्ये ऐतिहासिक भूगोलाचा अभ्यास करणारे विलियम क्रोन, विल्यम डेविस, पीटर हॉल इत्यादी नावे घेता येतील. आपल्या देशात मात्र हा विषय आजही दुर्लक्षित आहे.
बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी होत असलेल्या शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांचा भौगोलिक दृष्टिकोनावर व तसेच त्यांचे राजनैतिक दृष्टिकोनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखाद्वारे करण्यात आले आहे.
राजेंनी बांधलेले गड किल्ले व त्यांच्या भूराजनीतिक वापर स्पष्ट करण्यासाठी राजेंनी अफजलखानाला प्रतापगड च्या पायथ्याशी आणण्यामध्ये त्यांचा असणारा दृष्टिकोन स्पष्टपणे भूराजनीतिक यशाचे उत्तम उदाहरण आहे. कारण प्रतापगड च्या पायथ्याशी येईपर्यंत घनदाट जंगलातून यावे लागते राजेंची गनिमी काव्याची युद्धनीती त्याकरता वापर करण्यात आलेला जंगलमय व दुर्गम प्रदेश ज्यामध्ये आपले सैनिक लपून राहणार व प्रसंगी खानाच्या सैन्यावर तुटून पडण्याचे संकेत मिळताच त्यांच्यावर हल्ला करणे ही युद्धाची व्यवहरचना रचताना शिवाजी महाराजांना असलेल्या भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन कळून येते. ते भूगोलाच्या अभ्यासकाने आणि विद्यार्थ्यांनी शिकावे. आजही मेढा मार्गे प्रतापगड कडे जात असताना डोंगररांगांचा आणि घनदाट जंगलाचा प्रदेश हे शिवकाळामध्ये कसे होते याचा विचार जरी केला तरी अंगावर शहारे येतात. प्रतापगड चा हा किल्ला जंगलांनी व पर्वतरांगांनी वेढलेला होता. या किल्ल्यावरून कोकणातील शेकडो किलोमीटर प्रदेश दिसते. त्यावेळी सैन्य हे नेहमी पायदळ, घोडदळ द्वारे मार्गक्रमण करीत असत प्रतापगडच्या किल्ल्यावरून ते स्पष्ट दिसत होते. किल्ल्याच्या बाबतीत प्रतापगडचे स्थान अधोरेखित करत असताना महाबळेश्वरच्या जटात व पार घाटाच्या ओठात हा किल्ला बांधलेला आहे. राजे व अफजलखान यांच्यामध्ये प्रतापगडच्या पायथ्याशी झालेले युद्ध व त्या जागेची भौगोलिक पार्श्वभूमी पाहिली असता उपलब्ध भौगोलिक परिस्थितीचा योग्य वापर राजेंनी आपल्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीद्वारे चे केले होते याचा अभ्यास करणे आजही गरजेचे आहे. खानाला मारल्यानंतर त्यांच्या सैन्याची जी दाणादाण उडाली त्या सैन्यावर तुटून पडणारे महाराजांचे शूरवीर त्यात मिळालेले यश या सर्व घटना वरून राजेंनी भौगोलिक ज्ञानाचा वापर आपल्या युद्धनीतीमध्ये केलेले दिसून येते.
राजे हे भूगोलाचे जाणकार होते हे दुसऱ्या उदाहरणावरून कळून येते. महाराजांनी पन्हाळगडावरून विशाळगड कडे जात असताना निवडलेला मार्ग हा देखील भूराज नैतिक आणि ऐतिहासिक भूगोलाचे उत्तम उदाहरण आहे. कारण पन्हाळ्याहून विशाळगडकडे जात असताना अरुंद पाऊल मार्गाने मार्गक्रमण करत असताना ज्या ठिकाणी बाजीप्रभू नी खिंड लढवली त्या प्रदेशाचा आणि पन्हाळा ते विशाळगड कडे जाण्याचा जो मार्ग महाराजांनी निवडलेला होता आजच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण किल्ल्यातून बाहेर जात असताना शत्रूला याचा मागोवादेखील लागता कामा नये याची पूर्ण खबरदारी राजेंनी आपल्या मार्गा निवडी मधून सिद्ध केल्यामुळे ते विशाळगडावरती सुखरूप पोहोचू शकले. आज आपण ज्यास पावनखिंड म्हणतो हा प्रदेश अत्यंत दुर्गम व आव्हानात्मक होते.
भौगोलिक ज्ञानाची उपजत ज्ञान असलेले राजे आपल्या युद्धनीतीमध्ये भूगोलाचा योग्य पद्धतीने वापर केलेले दिसून येते. राजेंना भौगोलिक घटकांचा वापर कोणत्या प्रसंगात कसे करावे याचे उत्तम ज्ञान होते.
राजांनी त्यावेळी पाण्याची बचत कशी करावी हे त्यानी प्रत्येक किल्ल्यावरील पाणी साठवण तलाव होय.
आज आपण सर्वत्र पाणी आडवा पाणी जिरवा, पाण्याची बचत करा, पड णाऱ्या पावसाचा थेंब थेंब वाचवा हा संदेश जेव्हा जेव्हा पाऊस कमी होतो त्यावेळेस देत असतो, परंतु राजेंनी बांधलेल्या सर्व किल्ल्यावर तलावांचा किंवा पाणी साठवण्याकरता जी व्यवस्था केलेली होती. आज आपण शिवकालीन साठवण तलावाचा अभ्यास एका वेगळ्या दृष्टिकोनातून करणे अत्यंत आवश्यक आहे. राजेंनी पाण्याचे महत्त्व ओळखूनच प्रत्येक गडावर पाण्याची साठवणूक कशी करावी याचे उत्तम उदाहरण घालून दिले होते.
आज प्रत्येकाने म्हणजेच भूगोल, राज्यशास्त्र किंवा इतिहासाच्या अभ्यासकांनी राजेंनी आपल्या प्रशासनामध्ये, युद्धनीतीमध्ये भौगोलिक घटकांचा वापर कसा केलेला आहे, याचा पुन्हा एकदा अभ्यास शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी करावे व तसे केल्यास प्रस्तुत लेख लिहिण्याचे सार्थक होईल असे मला वाटते.
डॉक्टर शिवराय
आडवीतोट

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

प्राचार्य
सी. बी. खेडगी महाविद्यालय अक्कलकोट.
9022020010

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button