अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. यतीन जाधव यांची निवड
निवड नियुक्ती

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. यतीन जाधव यांची निवड

चिपळूण –गेली पन्नास वर्षे बालसाहित्य क्षेत्रात कार्यरत असणारी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था मुलांमध्ये मराठी भाषेची, साहित्याची आवड निर्माण व्हावी, त्यांनी स्वतः विविध विषयांवर वाचन-लेखन करावे, या हेतूने मुलांसाठी साहित्य संमेलन घेणे, लेखनकार्यशाळा आयोजित करणे, मुलांसाठी व मुलांनी लिहिलेले साहित्य प्रकाशित करणे यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम घेत असते. सुवर्णमहोत्सवी वर्षात ५० नवीन शाखा निर्माण करण्याचा संस्थेचा संकल्प असून संस्थेची २६ वी शाखा नुकतीच स्थापन करण्यात आली. या संदर्भात डॉ. प्रकाश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १५ फेब्रुवारी, २०२५ रोजी चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे माझ्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत शाखा स्थापनेची व कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. शाखेचे अध्यक्ष म्हणून डॉ. यतीन जाधव यांची निवड झाली. अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत.
उपाध्यक्ष अरविंद पोतदार, उपाध्यक्ष प्रकाश काणे, कोषाध्यक्ष प्रशांत देवळेकर, सहकोषाध्यक्ष मानसी अमोल टाक, कार्यवाह सौ. प्राची जोशी, सहकार्यवाह सौ. मेधा लोवलेकर
सदस्य शिवाजी शिंदे, रवींद्र गुरव, अपूर्वा फणसे, पंकज तांबट
सल्लागार म्हणून राष्ट्रपाल सावंत, चेतना वडके यांची निवड झाली.
