गावगाथा

कै. एच. एस.पाटील प्राथमिक आश्रम शाळेस स्मार्ट एल ई डी टी व्ही व साउंड सिस्टीम सप्रेम भेट

सामाजिक बांधिलकी

कै. एच. एस.पाटील प्राथमिक आश्रम शाळेस स्मार्ट एल ई डी टी व्ही व साउंड सिस्टीम सप्रेम भेट

नागनहळ्ळी ता अक्कलकोट जि सोलापुर येथील श्री साईबाबा तरुण मंडळ संचलित कै एच एस पाटील प्राथमिक आश्रम शाळेस दसर्याच्या शुभमुहुर्तावर दुरचित्रवाणी संच गळोरगीचे सुपुत्र शाळेतील सह शिक्षक श्री संजय शरणप्पा कवटगी यांच्या वतीने भेट म्हणुन देण्यात आले.संस्था प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी त्यांच्याकडुन Smart TV & Sound Bar विद्यार्थ्यासाठी स्वयंप्रेरणेने सप्रेम भेट म्हणुन दिल्याचे सांगितले..Smart TV च्या माध्यमातून अध्ययन करताना
विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावरील आनंद खूपच आल्हाददायक व नयनरम्य होता.या माध्यमातून जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला निश्चितच चांगली दिशा मिळणार आहे. संस्कार, शिक्षण ,सेवा आणि शिस्त असे विविध मूल्य रुजवण्याचे काम संस्थेच्या वतीने पुर्वी पासुनच होत आहे. Smart TV वितरण उद्घाटन प्संस्थेचे सचिव श्री जावेदजी पटेल साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थी वर्गाचे हित जोपासल्या बद्दल सहशिक्षक श्री संजय कवटगी यांचा सत्कार संस्थेच्या वतीने सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला.समस्त गळोरगी ग्रामस्थांनी सुध्दा त्यांच्या या कामाचे कौतुक केले.यावेळी
प्राचार्य श्री मुजावर सर, मुख्याध्यापक श्री शेख सर, सर्व प्राध्यापक, शिक्षक, अधीक्षक व महिला अधिक्षिका ,कर्मचारी वृंद व बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button