*श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 91 व्या पुण्यस्मरणोत्सव सोहळा निमित्त नागणसूर तुप्पीन मठ येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन*
*मठाचे मठाधिपती डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.*
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231025-WA0044-450x470.jpg)
*श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 91 व्या पुण्यस्मरणोत्सव सोहळा निमित्त नागणसूर तुप्पीन मठ येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
*मठाचे मठाधिपती डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
*🔶अक्कलकोट :(प्रतिनिधी)
*श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 91 व्या पुण्यस्मरणोत्सव सोहळा निमित्त नागणसूर तुप्पीन मठ येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती मठाचे मठाधिपती डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 91 व्या पुण्यस्मरणोत्सव सोहळा निमित्ताने धर्मध्वजारोहण, 11 हजार सुहासिनींचे ओटी भरणे, 7 हजार जंगम गणाराधना, सामुदायिक विवाह सोहळा, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, कर्नाटकचे सुप्रसिध्द गायक राजेश कृष्णन यांच्या उपस्थितीत गडिनाड कोगिले गायन स्पर्धा, धारवाडचे सुप्रसिध्द कलावृंदाचे नृत्याविष्कार सादर होणार आहे.
गुरुवार, दि.26 ऑक्टोंबर 2023 रोजी सायं.6 वाजता गडिनाड कोगिले राज्यस्तरीय गायन स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून सारेगम कार्यक्रमाचे निरीक्षक मेलोडी किंग राजेश कृष्णन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दि.27 रोजी सकाळी महारुद्राभिषेक, ध्वजारोहण, सामुदायिक विवाह, धर्मसभा, 11 हजार सुहासिनींचे ओटी भरणे कार्यक्रम, 7 हजार जंगमांचे जंगमाराधना, श्री जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्कार आणि असंख्य भक्तांना पुरणपोळी तुपाचे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.28 रोजी सायं.5 वा. श्रींचे भव्य फोटो व वचनग्रंथ मिरवणूक निघणार आहे.
या पुण्यस्मरणोत्सव कार्यक्रमास खा.डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी, म.नि.प्र.गुरुपालिंग महास्वामीजी, म.नि.प्र.राजशेखर महास्वामीजी, म.नि.प्र.शिवानंद महास्वामीजी, अभिनव पुंडलिंग महाराज, म.नि.प्र.शिबसवराजेंद्र महास्वामीजी, म.नि.प्र.अभिनव शिवलिंग महास्वामीजी, म.नि.प्र.डॉ.शांतलिंग महास्वामीजी, ष.ब्र.श्रीकंठ शिवाचार्य, श्री सोमलिंग महाराज, म.नि.प्र.शिवलिंग महास्वामीजी, ष.ब्र.शिवयोगी शिवाचार्य, म.नि.प्र.बसवलिंग महास्वामीजी, श्री चन्नमल महास्वामीजी, म.नि.प्र.अभिनव कोटूरेश्वर महास्वामीजी, म.नि.प्र.अभिनवशिवलिंग महास्वामीजी (मादनहिप्परगा), ष.ब्र.शंभुलिंग शिवाचार्य, म.नि.प्र.प्रभुशांत महास्वामीजी, श्री गुरुनाथ महाराज, श्री विठ्ठललिंग महाराज, श्री करिसिध्देश्वर महाराज, श्री संदेश महाराज, करी सिध्देश्वर महाराज, श्री वीरशिवलिंग महास्वामीजी, शिवाजीराव महाराज देहू, राजेंद्र सुरवसे महाराज, प.पू.पांडूरंग महाराज, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, आमदार यशवंतगौडा पाटील, आमदार एम.वाय.पाटील, माजी आ.सिद्रामप्पा पाटील, सभापती अप्पू परमशेट्टी, नितीन गुत्तेदार, महेश हिंडोळे, कन्नड साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र घटक अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी, मलिकजान शेख, महिबूब मुल्ला, अशपाक बळोरगी यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमास उपस्थितीत लाभणार आहे.