
शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा प्रत्येकानेच घ्यावी रेखा सोनकवडे

जि .प .प्राथमिक मराठी शाळा वागदरी ता .अक्कलकोट जि .सोलापूर या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उल्हासित वातावरणात पार पडली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष पोमाजी होते .हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज श्रीमंत श्रीमानयोगी श्री .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे पूजन संतोष पोमाजी व मारुती शिंदे यांनी केले .पार्थ कलबुर्गी वेदांत अवताडे श्रावणी सूरवसे मनिषा यादव इत्यादी विद्यार्थ्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती सांगितली .संग्राम पोमाजी हा महाराजाच्या वेशभूषेत आला होता .मारुती शिंदे या पालकांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल माहिती सांगितली .अनुसया कलशेट्टी अर्चना गिरी मनिषा कुणाळे कविता फड यांनी स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे कर्तुत्ववान होते .त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्मिती केली त्यांचे कार्य घडवलेला इतिहास याबद्दल माहिती सांगितली .शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रूवारी 1630 साली शिवनेरी किल्यावर झाला .शिवरायाचे बालपण खूप धामधुमीत गेले .वयाच्या बाराव्या वर्षापर्यत आई जिजाऊच्या देखरेखीखाली व शहाजी राजानी नेमलेल्या शिक्षकाकडून कला विद्या भाषा अवगत केल्या .विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायानी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली .छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धे होत .महाराज अत्यंत हुशार आणि दूरदृष्टी राजे होते .प्रजेचे रक्षण करणारा प्रजेची काळजी घेणारे राजे होते .कलम नव्हती कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा असे माहिती सांगताना मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे म्हणाल्या . राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला !गर्व ज्यांचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवाजी जाहला ! सह्यादीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला .हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुध्द लढण्याचा इरादा नेक होता .असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता .श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग .हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद .धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य ते आपले छत्रपती शिवाजी महाराज .राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य कर्तुत्व जगाला प्रेरणा देणारे आहे .अनेक राजे होऊन गेले पण यासम नाही .त्यांनी घडवलेला इतिहास वाचला ऐकला तर अंगावर शहारे येतात .छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या कार्याला अनंतकोटी अभिवादन व मानाचा मुजरा .हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज श्रीमंत श्रीमानयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !! असा जयजयकार करत रेखा सोनकवडे यांनी महाराजांचे कार्य व गुणगौरव सांगितले . अनुसया कलशेट्टीव अर्चना गिरी यांनी विद्यार्थ्याना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाण्यावर अतिशय सुंदर न्रुत्य विद्यार्थ्यानी सादर केले .याप्रसंगी आजी माजी पालक ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी उपस्थिती दाखवली .संतोष पोमाजी मारुती शिंदे गजानन सूरवसे शरण सूरवसे मधु सावंत रतन शिंदे रियाज शेख संगीता पोमाजी सौ .शिंदे इत्यादी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .रेखा सोनकवडे अनुसया कलशेट्टी बनसोडे अर्चना गिरी मनिषा कुणाळे कविता फड हे शिक्षक उपस्थित होते .तोलन अब्दुलरजाक बागवान हे शिक्षक शिवजयंती कार्यक्रमाला उपस्थित नव्हते .कविता फड यांनी सूत्रसंचालन केले तर आभार मनिषा कुणाळे यांनी मानले .
