छत्रपती शिवरायांचे शौर्य येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत – प्रथमेश इंगळे
शिवजयंती निमीत्त स्विमिंग ग्रुपच्या वतीने शिवरायांना अभिवादन केल्यानंतर प्रथमेश इंगळे यांचे मनोगत.

छत्रपती शिवरायांचे शौर्य येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत – प्रथमेश इंगळे

शिवजयंती निमीत्त स्विमिंग ग्रुपच्या वतीने शिवरायांना अभिवादन केल्यानंतर प्रथमेश इंगळे यांचे मनोगत.

(श्रीशैल गवंडी, दि.१९/०२/२०२५) (अ.कोट) —- छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्यचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे. स्वराज्य स्थापनेपासून आजपर्यंत महाराष्ट्राचे राजकारण आणि सत्ता हे छत्रपती शिवाजींच्या नावानेच सुरू असलेले पाहायला मिळते. त्यांचे शौर्य आणि कधीही पराभव न स्वीकारण्याची जिद्द आजही आपल्या बांधवांना प्रेरित करते म्हणून छत्रपती शिवरायांचे शौर्य येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व स्विमिंग ग्रुपचे संस्थापक महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांनी व्यक्त केले. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्विमिंग ग्रुपच्या वतीने संस्थापक महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रथमेश इंगळे बोलत होते. पुढे बोलताना प्रथमेश इंगळे यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून प्रत्येकाने महाराजांची जयंती साजरी करावीच, परंतु आजच्या एकविसाव्या शतकातील तरुणाईने महाराजांच्या आदर्श विचारसारणीचे मापदंड व त्यांच्या यशोगाथेची महती आत्मसात केल्यास शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल असे मनोगत व्यक्त करून महाराजांच्या जीवन कार्याचा गौरव केला. याप्रसंगी स्विमिंग ग्रुपचे सदस्य संतोष पराणे, सचिन किरनळ्ळी, शिवशरण अचलेर, शैलेश राठौर, अमर पाटील, सुनिल पवार, विश्वनाथ देवरमनी, शेखर आडवितोटे, मल्लिनाथ माळी, अरविंद पाटील, अमर पाटील, भासगी, स्वामीनाथ मुसळे,अशोक कलशेट्टी, हनुमंत माळी, विश्वनाथ शिंदे, बाबा सुरवसे, श्रीकांत झिपरे, श्रीशैल गवंडी, सुनिल पवार, गिरीश पवार, खाजप्पा झंपले, संतोष जवळगे, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, तुषार मोरे, ज्ञानेश्वर भोसले, मनोज जगताप, इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – शिवजयंती निमित्त शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य सदस्य दिसत आहेत.
