
*नागणसूर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.*

*नागणसूर येथे श्री गुरु बसवलिंगेश्वर शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.* छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पूजन करून महाआरती करण्यात आले.माताभगिनींनी शिवाजी महाराज नामकरण सोहळा ( पाळणा ) कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी नवनियुक्त पोलीस कु नागेश नागलगाव कु चंद्रकांत माशाळकर या बांधवांचे सत्कार करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर श्री प्रसाद प्रचंडे (तंटामुक्त अध्यक्ष नागणसुर) शशिकांत कळसगोंडा, मल्लिनाथ भासगी, गीरमल्ला गंगोडा, हजरत पटेल, बसवराज मंटगी, हणूमंत मणुरे,प्रशांत नागुरे, बी.बी धानशेट्टी, चिदानंद मठपती, श्रीशैल दोडमणी, धरेप्पा डोंगरीतोट, शांतविरप्पा कळसगोंडा, बसनिंगप्पा हिप्परगी, श्रिशैल मोगली (मेजर),सिद्धाराम शिवमूर्ती, प्रकाश दुधनिकर,सचिन माड्याळ, काशिनाथ धानशेट्टी,प्रशांत बिराजदार, प्रदीप कल्याण, भीमाशंकर सोलापूरे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री बसवराज खिलारी सर प्रा श्री प्रशांत नागुरे सर यांनी शिवचरीत्र विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थी कुमारी श्रावणी सुरवसे, चि श्रेयश सुरवसे जोशपूर्ण भाषण करून परिसर शिवमय केले. कु तन्वी मोरे, ख़ुशी खिलारी, कृतिका हंद्राळमठ विद्यार्थीनी सुंदर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बसवराज खिलारी सर यांनी केले तर आभार मंडळाचे प्रमुख बसवराज मोरे यांनी मानले. या शिवजन्मोत्सव कार्यक्रमास गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रमाचे शेवट गोड प्रसादने करण्यात आले.
