छत्रपतींचे कार्य, कर्तृत्व समजून घेण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र अभ्यासले पाहिजे,’ — सेवानिवृत्त शिक्षक शिवानंद मठपती
शिवजयंती विशेष

अक्कलकोट, दि.१९- :
छत्रपती शिवरायांचा वारसा जगासाठी प्रेरणादायी आहे. तो तरुण पिढीसमोर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. आणि स्वराज्यात त्यांनी दीनदुबळ्यांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय दिला. महाराजांनी केव्हाही जातीयवाद केला नाही. छत्रपतींचे कार्य, कर्तृत्व समजून घेण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र अभ्यासले पाहिजे,’ असे मत सेवानिवृत्त शिक्षक शिवानंद मठपती यांनी व्यक्त केले.

येथील लोकमंगल विहार परिसरात श्री वटवृक्ष तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भगवा कट्टा ध्वजस्तंभासह श्री वटवृक्ष सार्वजनिक वाचनालयाच्या शुभारंभ प्रसंगी मठपती
प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश शिंदे हे होते. व्यासपीठावर वेदमूर्ती रुद्रय्या स्वामीजी, पौरोहित्य गुड्डय्या स्वामी, मनोज निकम, माजी क्रिडा शिक्षिका उषा हंचाटे, बासलेगांवचे माजी सरपंच जगदीश बिराजदार, मंडळाचे अध्यक्ष बसवराज आगरखेड, कार्याध्यक्ष चंद्रकांत दसले, नागराज कुंभार आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवनिमित्त भगवा कट्टा या ध्वजस्तंभाचे पूजन, दिपप्रज्वलन व पुतळा पूजन श्री वेदमूर्ती रुद्रय्या स्वामीजी व लोखंडे मंगल कार्यालयाचे संचालक शिवाजीराव लोखंडे यांच्या हस्ते व पुरोहित गुड्डय्या स्वामी शास्त्री यांच्या विविध मंत्रोपचाराने करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर गुड्डय्या स्वामी, उषा हंचाटे व प्रसाद फडतरे यांचेही व्याख्यान झाले.

प्रास्ताविक भाषणात
परिसरातील नागरिकांना दैनिक वर्तमानपत्र वाचनाची सोय व्हावी या उद्देशाने श्री वटवृक्ष सार्वजनिक वाचनालयाचे शुभारंभ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोबाईल पासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने आणि वाचन संस्कृती वाढविण्याच्या मूळ उद्देशाने सदरची वाचनालय सुरू करण्यात आले असल्याचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दसले यांनी सांगितले.

या सर्व कार्यक्रमास माजी सैनिक अनिल हत्ते, मलप्पा सोड्डे, इरण्णा पाटील, विजयकुमार हौदे, हनुमंत घोसले, बाबुराव विभूते, अॅड. सविता बाके, कलाशिक्षक वन्यालोलू, माजी प्रा. चंद्रकांत पाटील, माजी नगरसेविका भागुबाई कुंभार, माजी नगरसेवक केरबा होटकर, मारुती आळवीकर, वेदेश गुरव, सचिन डिग्गे, पोलिस बसवराज कुंभार, दिगंबर साळुंखे, महिला मंडळ आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सदस्य विरुपाक्ष कुंभार यांनी केले.
