स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात मंगलमय वातावरणात व मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहारुढ पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना
शिवरायांचा पाळणा कार्यक्रम बुधवारी दिड हजार महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जय भवानी...! जय शिवराय...!! च्या घोषणानी आसमंत दुमदुमला होता.*

*🔶अक्कलकोट : (प्रतिनिधी)*
*जय भवानी…! जय शिवराय…!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात मंगलमय वातावरणात व मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहारुढ पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना व शिवरायांचा पाळणा कार्यक्रम बुधवारी दिड हजार महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जय भवानी…! जय शिवराय…!! च्या घोषणानी आसमंत दुमदुमला होता.*


श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व मंडळाचे मार्गदर्शक सुरेशचंद्र सूर्यवंशी, शामराव मोरे, बाबासाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संयोजक अमोलराजे भोसले मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजन्मोत्सव – २०२५ साजरा करण्यात आला.

दरम्यान प्रतिष्ठापना व पाळणा कार्यक्रम जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात छत्रपती शिवरायांच्या सिंहारुढ पुतळ्याची प्रतिष्ठापना बुधवारी सायंकाळी ६ वा. हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थाच्या संस्थापिका अध्यक्षा व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या विश्वस्ता अलकाताई जन्मेजयराजे भोसले, सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, अनुयाताई फुगे, माजी नगरसेविका सोनाली शिंदे, रत्नमाला मचाले, स्मिता कदम, पल्लवी कदम, संगिता भोसले, स्वाती निकम, उज्वला भोसले, पल्लवी नवले, कविता वाकडे, कविता भोसले, रूपा पवार, क्रांती वाकडे, छाया पवार, जयश्री माने, प्रांजली घाटगे, पुष्पा घाडगे, स्वप्ना माने, तृप्ती बाबर, आशा कदम, ज्योती कदम, कल्पना मोरे, सरोजनी मोरे, धनश्री पाटील, ऋति मोरे, अनिता साळुंखे, दिपाली हत्ते, सुवर्णा धोत्री, सिमा फुटाणे, सुवर्णा घाटगे, लता मोरे यांच्या सह मान्यवर महिला प्रमिला देशमुख, उषा छत्रे, वर्षा चव्हाण, कोमल क्षीरसागर, मल्लम्मा पसारे, सोनाल जाजू, मनिषा माळशेट्टी, सुवर्णा साखरे, सुजाता भीमपूरे, स्नेहलता जाधव, सूनयना मोरे, लक्ष्मी अचलेर, प्रिया देवकर, कामिनी भोसले, वैशाली हावनुर, संगीता राठोड, स्वाती माने-पाटील, शोभा शिंदे, राणी बुधले, दिपिका शिर्के, सुनंदा तेली, लक्ष्मी माने, रंजना मोरे, रेखा पाटील, प्रांजली घाडगे, सुवर्णा कदम, स्नेहल माळशेट्टी, पवित्रा मलगोंडा, सिनिता हडलगी, अलका थोरात यांच्यासह तालुक्यातील काळेगाव, शिरवळ, कुरनूर, चुंगी, वळसंग, सांगवी येथील महिला मंडळासह सखी ग्रुप, वीरशैव महिला मंडळ, जिजाऊ सखी मंच यांच्यासह शहरातील विविध महिला मंडळ भगिनींच्या हस्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळाचे संस्थापक जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजयराजे भोसले, प्रथमेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, सिद्धेश्वर मोरे, ओंकारेश्वर उटगे, विश्वनाथ देवरमनी, दत्ता पाटील, राजू इंगळे, मोहनराव चव्हाण, सुनील बंडगर, मल्लिनाथ करपे, प्रविण देशमुख, प्रा.भीमराव साठे, सुभाष गडसिंग, सुधाकर गोंडाळ, अरविंद शिंदे, मेजर जाधव, बाळासाहेब घाटगे, रवी कदम, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
दरम्यान न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी व सोमनाथ कुलकर्णी यांनी मंत्रांच्या जयघोषात विधीवत्त छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराज की जय..! च्या जयघोष व नयनरम्य फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांना राष्ट्रमाता जिजाऊंची प्रतिमा भेट देण्यात आली. याप्रसंगी कु. शिवतेज सावंत, कु. शिवतेज शिंदे, कु. सदिच्छा ग्राम, कु. सिद्धी पाटील, कु. श्लोक फडतरे, कु. सोनाली पाटील, कु. तेजस डिसले, यांचे छत्रपती शिवरायांवर भाषणे संपन्न झाली. चिमुकल्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी शिवजन्मोत्सव अध्यक्ष प्रसाद मोरे, उपाध्यक्ष अमित घाडगे, सचिव आकाश सूर्यवंशी, श्रीधर गुरव, खजिनदार शितलबापू फुटाणे-जाधव, कार्याध्यक्ष विशाल कलबुर्गी, राजू पवार, फहीम पिरजादे, मिरवणूक प्रमुख संतोष भोसले, बाळासाहेब पोळ, प्रवीण घाडगे, निखील पाटील, गोटू माने, सनी सोनटक्के लेझीम संघ व्यवस्थापक वैभव मोरे, योगेश पवार, प्रथमेश पवार, मंगेश सूर्यवंशी, शिवजयंती स्टेज व मिरवणूक ट्रॉली सजावट प्रमुख राहुल मोरे, वैभव कामनुरकर, समर्थ घाडगे, व्यवस्थापक मनोज निकम, चंद्रकांत सोनटक्के, राजाभाऊ नवले, नितीन शिंदे, सौरभ मोरे, रोहित खोबरे, अतिश पवार सत्कार प्रमुख आकाश शिंदे, प्रशांत कडबगावकर प्रसिद्धी प्रमुख प्रवीण देशमुख सूत्रसंचालन प्रा.प्रकाश सुरवसे, प्रा. मनोज जगताप सोशल मिडिया प्रमुख अतिश पवार यांच्यासह आदिजन उपस्थित होते.
यावेळी कांत झिपरे, रणजीत गोंडाळ, सनी सोनटक्के, गणेश भोसले, शिवा मंगरुळे, पिंटू मचाले, लक्ष्मण विभूते, सागर गोंडाळ, अतिश पवार, चंद्रकांत कुंभार, संजय गोंडाळ, पिट्टू साठे, ज्ञानेश्वर भोसले, संतोष माने, समर्थ घाडगे, सुराज्य घाडगे, युवराज सोनटक्के, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, शुभम चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह अमोलराजे भोसले लेझीम संघाचे सदस्य व युवक कार्यकर्ते बहुसंख्याने उपस्थित होते. दरम्यान अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या शिवस्मारक, शिवसृष्टी, श्री स्वामी समर्थ वाटिका, आश्रयदाते कक्षातील छत्रपतींच्या पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.प्रकाश सुरवसे व प्रा.मनोज जगताप यांनी केले. दरम्यान श्री कमलाराजे चौकातील शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठापना व पूजन आधारस्तंभ अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
चौकट : २१ फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक :
शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक निघणार असल्याचे उत्सव अध्यक्ष प्रसाद मोरे यांनी सांगितले.