शिवजन्मोत्सव मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद ; पारंपरिक ५०० युवकांच्या लेझीम पथकाचा खेळ पाहण्यासाठी गर्दी
शिवजयंती विशेष

शिवजन्मोत्सव मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद ; पारंपरिक ५०० युवकांच्या लेझीम पथकाचा खेळ पाहण्यासाठी गर्दी
*अक्कलकोट : (प्रतिनिधी)*
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व मंडळाचे सुरेशचंद्र सूर्यवंशी, शामराव मोरे, बाबासाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संयोजक अमोलराजे भोसले मित्र मंडळ यांच्या वतीने शुक्रवारी शिव छत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने जय भवानी…! जय शिवराय…!! च्या जयघोषात शिवजन्मोत्सवाची सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत अमोलराजे भोसले मित्र मंडळाचे ५०० युवकांच्या लेझीम पथकाचा खेळ लक्षवेधी ठरले..! शिवप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती.*


दरम्यान सायंकाळी ६ वा. शिव छत्रपतींची भव्य मिरवणूक माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख अमोल (बापू) शिंदे, शैलेश पिसे, संजय देशमुख, प्रथमेश इंगळे, तालुका कृषीअधिकारी हर्षद निगडे देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावार, सो.म.पा.माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे, उत्तर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, उपनिरीक्षक ननावरे, अविनाश मडीखांबे, धनेश अचलेरे यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची विधिवत पूजन अप्पू पुजारी व सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पटनाणे करण्यात आले.


सदराची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरील जुना राजवाडा समोरून कमलाराजे चौक, एवन चौक, नवा राजवाडा मार्गे, छ. शिवाजी महाराज चौक एस. टी. बसस्थानक, विजय कामगार चौक, कारंजा चौक, मेन रोड मार्गे, तूप चौक, फत्तेसिंह चौक ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

या मिरवणुकीस विश्वासराव निंबाळकर, रामचंद्रराव घाटगे, माजी पक्षनेता महेश हिंडोळे, बाळासाहेब देसाई, युवा नेता प्रथमेश म्हेत्रे, अरुण जाधव, सुधाकर गोंडाळ, बाळा शिंदे, सुभाष गडसिंग, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त भाऊ कापसे, चेअरमन गोकुळ शुगर दत्ता शिंदे, संतोष भोसले, लाला राठोड, मुस्लीम समाज संघटनाचे अध्यक्ष एजाज मुतवल्ली, रासप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल बंडगर, अॅड. विजय हर्डीकर, डॉ.आर.व्ही.पाटील, लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, सुनील गोरे, प्रमोद गोरे, अप्पासाहेब पाटील, राजशेखर हिप्परगी, शहर अध्यक्ष भाजपा शिवशरण जोजन, शबाब शेख, चंद्रकांत (पिंटू) सोनटक्के, प्रदीप जगताप, चंद्रकांत इंगळे, चंद्रशेखर मडीखांबे, संदीप मडीखांबे, शिवराज स्वामी, शैलेश राठोड, माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, सलिम येळसंगी, मैनुद्दीन कोरबू, नन्नु कोरबू, अंकुश चौगुले, भाजपा शहर सरचिटणीस बाळासाहेब शिंदे, बालाजी पाटील, शिंदे गटाचे शहर प्रमुख योगेश पवार, सोलापूरचे शेखर फंड, महेश कुलकर्णी, विकास भांगे, सचिन खंडागळे, ज्ञानेश्वर शिंदे, पृथ्वीराज काटकर, अभियंता किरण पाटील, अमित थोरात, अरविंद शिंदे, पै.मौला शेख, पै.महेश कुलकर्णी, छत्रपती प्रतिष्ठानचे गणेश गोब्बुर, सर्फराज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक संपन्न झाली. निघालेल्या मिरवणुकीचे विविध सामाजिक संघटना व पक्षाने स्वागत केले. मिरवणूक यशस्वीसाठी अमोलराजे भोसले मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे, प्रा. मनोज जगताप यांनी केले.
चौकट :
मिरवणुकीत सामील होणाऱ्या शिवभक्तांना विविध ठिकाणी मिरवणूक मार्गावर शहरातील सामाजिक संघटना, मान्यवरांकडून सुगंधी दुध, नारळ पाणी, अल्पोपहार देण्यात आला.