*अक्कलकोट : प्रतिनिधी* *श्री क्षेत्र अक्कलकोट येथील हत्ती तलावाच्या मजबुतीकरण, सुशोभिकरण, संगीत कारंजा या रुपये ५ कोटी कामास सुरुवात झाल्याने शहरवासी व स्वामी भक्तातून समाधान व्यक्त होत आहे.*
अक्कलकोट नगरपरिषदे कडून कायम दुर्लक्षित राहिलेल्या संस्थान कालीन हत्ती तलावाच्या मजबुतीकरण, सुशोभिकरण, संगीत कारंजा होण्या कमी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रयत्न केल्यामुळे या कामास शासन स्तरावरून रुपये ५ कोटीचा निधी उपलब्ध करून घेऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे. शहर विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासूनच्या शहर वासी व भक्तांच्या मागण्या विवीध विकास कामामुळे पूर्ण होत आहेत.
हत्ती तलावाच्या या कामामुळे शहर विकासात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे.