चपळगावात प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती.
शिवजयंती निमीत्त लाभला आरतीचा मान.

चपळगावात प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती.

शिवजयंती निमीत्त लाभला आरतीचा मान.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.२२/०२/२०२५)
तालुक्यातील चपळगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून गुरुवार रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व आरती येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांचे सुपूत्र प्रथमेश (मालक) इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील सर्व स्पर्धकांनी अत्यंत सुंदर पद्धतीने आपले विचार व्यक्त केले. तद्नंतर प्रथमेश इंगळे व पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रथमेश इंगळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीकांत झिपरे, सुनिल पवार,
धनराज स्वामी, दर्शन घाटगे, तुषार मोरे, स्वामी सर, चिदानंद हिरेमठ, मेजर माने,
विजयकुमार नना सर, संजय बानेगाव,
रमेश शिंदे सर, अविनाश कदम, प्रकाश सुरवसे, शिवाजी संभाजी सुरवसे, मल्लिनाथ पाटील सर, सुरेश इंगुले, विशाल सुरवसे,
शाम इंगुले, अविनाश इंगुले, संजय भोसले, महेश इंगुले, श्रीकांत दुलंगे, सचिन म्हेत्रे, अंबण्णा डोळे, श्रीमंत इंगुले, प्रदीप सुरवसे, मेघराज इंगुले, योगेश मोरे, संतोष मोरे, गंगाराम भोसले, गोकुळ मोरे, राम मोरे, अभिषेक भोसले, स्वामीराज इंगुले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज इंगुले, सुरेश सुरवसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत दुलंगे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर कदम यांनी मानले.

फोटो ओळ – चपळगांव येथे छत्रपती शिवरायांची आरती करताना प्रथमेश इंगळे, पो.नि.राजेंद्र टाकणे व अन्य मान्यवर दिसत आहेत.
