वटवृक्ष मंदिर समितीचे धार्मिक क्षेत्रातील योगदान अमूल्य – उपमहानिरीक्षक सायली धुरत
उपमहानिरीक्षक सायली धुरत यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे व इतर दिसत आहेत.

वटवृक्ष मंदिर समितीचे धार्मिक क्षेत्रातील योगदान अमूल्य – उपमहानिरीक्षक सायली धुरत

(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.२२/०२/२५) ——– स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या व स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अक्कलकोट नगरीतील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे धार्मिक क्षेत्रातील योगदान अमूल्य असल्याचे मनोगत भारतीय पोलीस सेवेतील मुंबई येथील केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे उपमहानिरीक्षक सायली धुरत यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री. स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व मा.नगराध्यक्ष – नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी उपमहानिरीक्षक सायली धुरत बोलत होत्या.
पुढे बोलताना उपमहानिरीक्षक सायली धुरत यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे राज्यातील एक जागृत तीर्थक्षेत्र असल्यामुळे आज अनेक भाविकांना स्वामींची जागृततेची प्रचिती येत आहे. त्यामुळेच समर्थांच्या भक्तगणांच्या संख्येत वाढ होत असल्याचे मनोगत व्यक्त केले. वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीनेही येणारया भाविकांकरीता करण्यात आलेल्या सोईसुविधांबाबत व मंदिर समितीच्या वतीने वर्षभरातुन राबविले जाणारे विविध धार्मिक कार्यक्रमांबाबत जाणून घेऊन समितीचे धार्मिक क्षेत्रातील योगदान अमूल्य असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, सोलापूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.शिवानंद तोरवी, प्रा.शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील, अमर पाटील, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, चंद्रकांत गवंडी, संतोष जमगे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ – उपमहानिरीक्षक सायली धुरत यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे व इतर दिसत आहेत.
