गावगाथाठळक बातम्या

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला या पाच आमदारांची दांडी ; राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता

मुंबई  (प्रतिनिधी):  लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्याकडून आता पक्षाला सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जातोय. त्यामुळे अजित पवार गटात सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. अजित पवार गटाच्या मंत्र्यांची आज अजित पवारांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर बैठक झाली होती. त्यानंतर सर्व आमदारांची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला 5 आमदारांनी अनुपस्थिती होती. या पाचही आमदारांनी आपली कारणे पक्षाच्या वरिष्ठांना कळवल्याची माहिती समोर येत आहे. पण आमदारांच्या अनुपस्थितीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

अजित पवारांच्या बैठकीत कोण-कोण अनुपस्थित?

HTML img Tag Simply Easy Learning    

अजित पवार गटाच्या आमदारांची आज बैठक पार पडली. या बैठकीला 5 आमदार उपस्थित नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे, अण्णा बनसोडे, धर्मराव बाबा आत्राम या आमदारांची बैठकीत अनुपस्थिती राहिली. मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरात लवकर करावा, अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये आलेल्या अपयशाबद्दलही या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

पाचही आमदारांनी गैरहजर राहण्यामागे काय कारण दिलं?

HTML img Tag Simply Easy Learning    

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आजारी असल्याचं पक्षश्रेष्ठांना कळवलं आहे. त्यामुळे ते आजच्या पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहू शकले नाहीत. आमदार नरहरी झिरवळ हे रशियाला गेले असल्याची माहिती समोर येत आहेत. तर आमदार सुनील टिंगरे हे बाहेर आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आमदार राजेंद्र शिंगणे यांनी आजारी असल्याचं पक्षश्रेष्ठींना कळवलं आहे. तर पिंपरी चिंचवडे आमदार आण्णा बनसोडे वैयक्तिक कारणास्तव बैठकीला गैरहजर राहिले. त्यांनी बैठकीला येणार नसल्याचं अजित पवार यांना कळवलं होतं, असं सांगितलं.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button