विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घ्यावेत यश निश्चित मिळेल –आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांचा विश्वास
श्रमसंस्कार शिबिरास सदिच्छा भेट

विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घ्यावेत यश निश्चित मिळेल –आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांचा विश्वास

श्रमसंस्कार शिबिरास सदिच्छा भेट

अक्कलकोट
राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावेत यश नक्कीच मिळते असा विश्वास आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

करजगी येथील मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिरास सदिच्छा भेट दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी सरपंच विवेकानंद उंबरजे, दयानंद उंबरजे, शब्बीर पटेल, संगीता गंगदे, दस्तगीर गोडी कट्टी, प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या हिताची आहे, श्रमाला प्रतिष्ठा देणे, वृक्षारोपण करणे, पर्यावरण संवर्धन, आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम तसेच ग्रामीण भागातील समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका या योजनेतील स्वयंसेवक घेतात. त्यामुळे जाणीव जागृती अत्यंत झपाट्याने झालेली आहे.

कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक राजशेखर पवार यांनी श्रम संस्कार शिबिराची माहिती दिली. यावेळी प्रा मधुबाला लोणारी उपस्थित होते.