गावगाथा

*प्राथमिक शिक्षकांच्या संस्कारातूनच मी घडले म्हणून प्राथमिक शिक्षकांबद्दल आत्मीयता* — *उपजिल्हाधिकारी अंजली मरोड*

*दक्षिण सोलापूर तालुका शिक्षक संघाचे कार्य कौतुकास्पद*---

*प्राथमिक शिक्षकांच्या संस्कारातूनच मी घडले म्हणून प्राथमिक शिक्षकांबद्दल आत्मीयता* — *उपजिल्हाधिकारी अंजली मरोड*
*दक्षिण सोलापूर तालुका शिक्षक संघाचे कार्य कौतुकास्पद*—

======================
जागतिक महिला दिनानिमित्त सुंदर मल्टीपर्पज हॉल नेहरूनगर येथे दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यामध्ये बोलताना उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनी वरील उदगार काढले. या महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे माजी राज्य अध्यक्ष तथा राज्य सल्लागार बाळासाहेब काळे हे तर प्रमुख आधारस्तंभ म्हणून शिवानंद भरले हे उपस्थित होते वस्तू व सेवा कर (GST) उपायुक्त सारिका दुधनीकर-भरले म्हणाले की,कर्तव्याबरोबर हक्काची जाणीव ठेवणारी संघटना म्हणजे दक्षिण सोलापूर तालुका शिक्षक संघ होय.
माजी जि.प.सदस्य अशोक देवकते,ज्येष्ठ नेते उत्तमराव जमदाडे,शिक्षण विस्तार अधिकारी गुरुबाळ सनके, अध्यक्ष विरभद्र यादवाड, सरस्वती भालके,अंबुताई इतापे,रामभाऊ यादव,राजकुमार बिज्जरगी,सिद्राम कटगेरी, रेवणसिद्ध हत्तुरे,काळप्पा सुतार,सुभाष फुलारी,नारायण घेरडे,गजेंद्र भालके, बसवराज खिलारी, सिद्रया कोळी,पुंडलिक कलखांबकर,काशिनाथ विजापूरे,मंजुनाथ भतगुणकी,बालाजी गुरव,म.ह्यात पाटील,सतीश वाले आदी उपस्थित होते. सालाबादाप्रमाणे दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या विविध स्पर्धा,गाणी, गोष्टी,भेंड्या,संगीत खुर्ची, लकी ड्रॉमध्ये विशेष *”सोन्याची नथ”* आदि विविध कार्यक्रम घेण्यात आले,यावर्षी नव्यानेच दक्षिण सोलापूर तालुक्यात कार्यरत असणाऱ्या महिला भगिनी मधून “राजमाता जिजाऊ” पुरस्कार देऊन तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून एक अशा एकूण सोळा महिला भगिनींचा *”राजमाता जिजाऊ पुरस्कार”* देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये बोलताना दक्षिण सोलापूर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष महिबूबसाब सवार यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षक संघ व महिला आघाडी वेगवेगळ्या उपक्रमातून महिलांच्या,विद्यार्थ्यांच्या व संघटनेच्या हिताचे वेगवेगळे उपक्रम नेहमीच घेत असल्याचे, सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आजवर शिक्षक संघाने निरंतर केलेले आहे असे प्रतिपादन केले. त्यानंतर शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड यांनीही संघटनेचा इतिहास हा प्रेरणादायी असून समाजामध्ये संघटनेला एक मानाचे स्थान असल्याचे सांगितले. श्री शिवानंद भरले यांनीही दक्षिण शिक्षक संघ व महिला आघाडीचे कार्य अतिशय उल्लेखनीय असल्याबाबत प्रतिपादन केले. शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब काळे यांनी स्त्री ही आजच्या युगातील मार्गदर्शक असून तिला विविध भूमिका समाजामध्ये कुटुंबामध्ये पार पाडावे लागतात त्यामुळे त्यांचे आयुष्य हे फार कसरतीचे आयुष्य असल्याचे प्रतिपादन करून स्त्रीविषयक गौरव उदगार काढले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध खेळांमध्ये क्रमांक मिळविलेल्या भगिनींचे बक्षीस देऊन सन्मान आला. मान्यवरांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी,प्रमाणपत्र,शाल व बुके देऊन “राजमाता जिजाऊ पुरस्कार” प्राप्त भगिनींना गौरवण्यात आले.*स्व.माजी मंत्री आनंदरावजी देवकते साहेब यांच्या स्मरणार्थ* मंद्रूप पतसंस्थेचे संचालक श्री. संजय देवकते सर यांच्या सौजन्याने ट्रॉफी देण्यात आल्या.

*यांचा झाला “राजमाता जिजाऊ पुरस्काराने” सन्मान*

सौ.प्रेमलता धनंजय देशमुख (कणबस),सौ.शिवकांता इरप्पा म्हेत्रे(बरूर),श्रीम.सोनूताई उमाकांत पाटील(कुसुर), श्रीम.ललितादेवी चंद्रकांत गोवर्धन(दोड्डी तांडा), श्रीम.गुलनाजबानो उस्मान नदाफ(हत्तूर उर्दु),श्रीम.शकिला नौशाद तांबोळी(फताटेवाडी) श्रीम.अनिता दत्तात्रय कोष्टी(वडापूर),श्रीम.भामती
 नागभूषणम बिर्रु (चाबुकस्वार वस्ती),सौ.प्रतिमा किरण सत्रे(सादेपूर),श्रीम.रुपाली विलास येवले(सेवालाल नगर), सौ.वैशाली अमोल क्षीरसागर (चिरकावस्ती),श्रीम.माया शिवाजीराव राजमाने(उळे), अपेक्षा अनंतकुमार रणदिवे (वळसंग),श्रीम.आशा बसवणप्पा वाले (तीर्थ),श्रीम.शिल्पा जाधव(पंचायत समिती,दक्षिण सोलापूर),श्रीम.माग्रेट फिलीप अडसुळे,देवीकवठे,(ता.-अक्कलकोट)

लकी ड्रॉ चा यावर्षीचा विशेष असा सोन्याची नथ मिळविण्याचा मान *अश्विनी बाळासाहेब वाघमोडे (जि.प.शाळा फताटेवाडी)* यांना मिळाला. त्यांना सोन्याची नथ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जि.प.कर्मचारी क्रीडा स्पर्धेत विजेत्या भगिनींचा ही सत्कार करण्यात आला.यावेळी विविध मान्यवरांनी दक्षिण सोलापूर शिक्षक संघ व महिला आघाडीचे कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुका शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी व महिला आघाडीतील सर्व महिला भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमानंतर स्वादिष्ट जेवणाची सोय करण्यात आलेली होती. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पतसंस्थेचे संचालक शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण शिक्षक संघ महिला आघाडी यांच्यातर्फे करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्षा विद्याताई जगताप,चेअरमन दयानंद वठारे,सिद्राम कटगेरी,राजकुमार बिज्जरगी,संजय देवकते,सुनिल बिराजदार,विनोद कोळी,प्रकाश कुंभार,रेवणसिद्ध हत्तुरे,मल्लिनाथ पूजारी,भिमराव पाटील,डाॅ.नागनाथ येवले, सुनील बिराजदार,शंकर म्हेत्रे,श्रीशैल बिराजदार,भिमशा चौगुले, अनिरुद्ध यादव,अंकुश माळी,शिवय्या मसुती,विजयकुमार बबलेश्वर,संजय मंगरूळे,केदारनाथ चौगुले,वसीम परवेज शेख, सिद्धाराम विजापूरे,सिध्दाराम स्वामी,कांतीलाल गुमतापुरे,मल्लिकार्जुन स्वामी,संगप्पा मेनकाळे,
शिवशरण म्हेत्रे,रब्बीलाल मुल्ला,शंकर म्हेत्रे,मल्लिकार्जुन स्वामी,विजय बिराजदार,
चिंनगीबादशहा कोटनाळ,शांतप्पा कांबळे, सुर्यकांत गुड्डेवाडी,गुरुबाळा बगले,श्रीशैल सुतार,पिरप्पा हडपद,महादेव कमळे,सतीश पटेल, रमेश कोटगी,खंडू म्हेत्रे,अपेक्षा रणदिवे,वैशाली हडलगी(म्हेत्रे),योजना पाटणे,अनिता कमळे,पार्वती तोळणूरे,अंजली जमखंडीकर,कमल भडंगे,अलका कदम,अंजली कोळी (नाटेकर),प्रज्ञा लासुरे,रेखा स्वामी,बद्रुन्निसा सगरी,सुनीता वनस्कर,अंबुबाई बोरगावकर,कलावती पत्की,लता कांबळे आदिंनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अंजली जमखंडीकर यांनी केले तर आभार सरचिटणीस अपेक्षा रणदिवे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button