गावगाथा

युवा मोर्चाचे सरचिटणीस शिवशंकर स्वामी यांची श्री स्वामी समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटी आय)येथे व्यवस्थापन समितीवर शासकीय सदस्य म्हणून निवड

निवड नियुक्ती

अक्कलकोट : भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस शिवशंकर स्वामी यांची श्री स्वामी समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटी आय)येथे व्यवस्थापन समितीवर शासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
श्री स्वामी समर्थ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अक्कलकोट या महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या एसटी पास, ज्या त्या महाविद्यालयाकडून जाचक अटी बाबत निवारण, विद्यार्थ्यांचे ऍडमिशन, विद्यार्थ्याकरिता महाविद्यालयातील सोयी सविधा बाबत आवाज उठविणे, समस्या सोडविने, आता शासनाच्या माध्यमातून संस्थेच्या व्यवस्थापन समितीवर काम करण्याची संधी मिळाली याचे सर्व विद्यार्थी आणि संस्थेची काही समस्या व विकासाच्या दृष्टीने कार्य करणार असल्याचे शिवशंकर स्वामी सांगितले.
त्यांच्या या निवडीबद्दल आमदार सचिन कल्याणशेट्टी, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष महेश इंगळे, नगरपालिका पक्षनेते महेश हिंडोळे, भाजपा शहराध्यक्ष शिवशरण जोजन, बालाजी पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष नन्नू कोरबू आदींनी शुभेच्छा दिल्या.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button