
“पुण्यात होणार हिरकणी पुरस्कार २०२५ आणि स्टाईल सिझन २ फॅशन शो”
पुणे – येत्या १६ मार्च २०२५ रोजी ड्रीम्ज इंस्टिट्यूट ऑफ कॉस्मेटॉलॉजी & अॅस्थेटिक्स आणि फेलक्रेझी प्रोफेशनल यांच्या वतीने “हिरकणी पुरस्कार २०२५” आणि “स्टाईल सिझन २” हा भव्य फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे.

मिस, मिसेस, मिस्टर आणि किड्स साठी असलेला हा फॅशन शो प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच योगेश ए. घोरपडे हे विशेष (VIP) पाहुणे म्हणून कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन मधुरा लॉन्स, नेअर रावेत ब्रिज, पिंपरी-चिंचवड, पुणे – ४११०३३ या ठिकाणी करण्यात आले असून, सकाळी ११ वाजल्यापासून कार्यक्रमास सुरुवात होईल.
फॅशन, कला आणि सौंदर्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू असून इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
७२७६५ ७२२३३

फॅशनप्रेमी आणि नवोदित कलाकारांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.

(अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा.)

