स्वामीकृपेने कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी नावलौकीकाने जीवनाचे सार्थक – पै. पृथ्वीराज मोहोळ
कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

स्वामीकृपेने कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी नावलौकीकाने जीवनाचे सार्थक – पै. पृथ्वीराज मोहोळ

स्वामी दर्शनानंतर महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ यांचे मनोगत.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.११/०३/२०२५)
कुस्ती हा आपल्या राष्ट्रीय स्तरावरचा मर्दानी खेळ आहे. या धर्तीवर कुस्ती या खेळास आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंद केसरी, महाराष्ट्र केसरीच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या माध्यमातून देशभरातील कुस्तीपटूंना आपले कौशल्य सिध्द करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. स्वामी कृपेने मलाही ही संधी लाभली आहे. अथक परिश्रम, मेहनतीच्या बळावर कुस्तीपटू म्हणून महाराष्ट्र केसरी पदक जिंकल्याने व लाभलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या नावलौकीकाने जीवनाचे सार्थक झाले असल्याचे मनोगत कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज मोहोळ यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी कुस्तीपटू पै.पृथ्वीराज मोहोळ यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला.

यावेळी कुस्तीपटू पै.पृथ्वीराज मोहोळ बोलत होते. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, मोहन जाधव, विपूल जाधव, शिवशरण अचलेर, दर्शन घाटगे, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.


फोटो ओळ – कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.