गावगाथाठळक बातम्या

Milk prices increased : राज्यात दुधाच्या किंमती वाढल्या ; प्रति लिटर इतक्या रुपयांची वाढ, आजपासून नवे दर लागू…

दयानंद गौडगांव

पुणे (प्रतिनिधी): महागाईचा झटका सर्वसामान्यांना सगळीकडे बसत असताना आता दुधाच्या दरातही २ रुपयांनी वाढ झाली आहे. बुधवारी दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज डेअरीमध्ये दूध दरवाढीबाबत महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये विविध सहकारी आणि खासगी संघांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, मानद सचिव प्रकाश कुतवळ, संगमणेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, श्रीपाद चितळे आणि पुणे जिल्हा संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे या बैठकीमध्ये उपस्थित होते. दुधाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आता गाई आणि म्हशीचे दूध खरेदी करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

सध्या गाईच्या दुधासाठी ५४ ते ५६ रुपये मोजावे लागत आहेत. नव्या दरवाढीनुसार आता एक लिटर दुधासाठी ५६ ते ५८ रुपये मोजावे लागणार आहे. तर सध्या म्हशीच्या एक लिटर दुधासाठी ७० ते ७२ रुपये मोजावे लागत आहेत. नव्या दरवाढीनुसार म्हशीच्या दुधासाठी ७२ ते ७४ रुपये मोजावे लागणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button