पवित्र रमजान महिन्याची सुर्वात रोजे (उपवास) पासुन होते.* *♦️उपासना मानवतेच्या सेवेचा रमजान सण इस्लाम धर्माच्या पाच मूलभूत स्तंभा पैकी एक आहे इस्लामचा पाया ईमान नमाज,जकात,रोजा आणि हज या पाच गोष्टीवर अवलंबून आहे.* *♦️इस्लाम धर्मातील १२ महिन्यातील १ महिना पवित्र रमजान हा महिना ईबादत, नमाज, रोजा, जकात, दानधर्म हे सर्व पवित्र कार्य रमजान मध्ये प्रत्येक मुसलमान करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून या महिन्याला पवित्र रमजान,पवित्र महिना मानला जातो.* *♦️रोजा म्हणजे, साधारणपणे पहाटे ५:०० ते संध्याकाळी ६:३० पर्यंत अन्न, पाणी काहीच न घेता कडक उपवास करणे.* *♦️आजच्या वैद्यकीय संशोधनानुसार १२ महिन्यातून किमान १५ दिवस कडक उपवास पाळल्यास शरीरातील विषाक्त पेशींचा नायनाट होतो.* *♦️म्हणून ३० दिवसाचे रोजे शरीरासाठी खूपच उपयुक्त ठरतात. शिवाय पचनसंस्थेस ३० दिवसांचा आराम मिळतो.* *♦️रमजान शब्दाचा अर्थ उष्ण आणि कोरडेपणा असा होतो या महिन्यात कुराण पठन करणे पुण्यकारक मानले जाते.* *♦️हजरत मोहम्मद पैगंबर यांनी एका हदिसमध्ये म्हटले आहे की जर एखाद्याने रमजानच्या महिन्यातील रमजानचा एक उपवास सोडला आणि त्याऐवजी आयुष्यभर रोजा उपवास केला तर त्याला रमजानच्या महिन्या इतकं महत्त्व नाही.* *♦️रमजान महिन्यात रोजा आणी तराबीची नमाज खूपच महत्वाच्या मानल्या जातात.* *♦️रात्री ८:३० वाजताच्या ईशाची ४ रकात नमाज झाल्यावर, किमान एक तासभर तराबीची नमाज असते. यामध्ये कुराने हाफिज, म्हणजे ज्या व्यक्तीला संपूर्ण कुराण हीफ्ज आहे अर्थात मुकपाठ आहे. ते हाफिजी तराबी नमाज मध्ये कुराण धर्मग्रंथाचे पठण करतात.* *♦️रमजान सताविस्वा रोजा २७ व्या रोजी म्हणजेच रमजानच्या २७व्या रात्री शब-ए-कद्र रोजी कुराण अवतरले रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये तरावीहची नमाज २० रखात नमाज अदा, करतात त्या व्यतिरिक्त सुन्नत,नफिल, नमाज व कुरान पठाण करतात व संपूर्ण रात्रभर इबादत दुवा आपल्या स्वतःच्या घरच्यांसाठी, समाजासाठी,शेजारी,गल्लीतल्या,गावातल्या व व संपूर्ण मानव जातीसाठी व देशाच्या प्रगतीसाठी बंधुत्वासाठी प्रेमासाठी,अल्लाहकडे प्रार्थना करतात.* *♦️आणि पवित्र अशा रमजान महिन्यांमध्ये दान-धर्म (जकात फित्रा) देणे याला रमजान मध्ये विशेष महत्त्व आहे.* *♦️जकात कुणावर फर्ज(अनिवार्य) आहे.* *♦️जो मालदार है (पैसेवाला, श्रीमंत) त्याच्यावरती जकात फर्ज है, म्हणजे अनिवार्य आहे.जकात कुणाला देऊ शकतात,जकात सर्वात आदोगर पाहुण्यांवर हक्क आहे.म्हणजे जवळचा पाहुणा गरीब आहे दोन टाईम जेवण बनवण्याच्या साहित्य घेण्यासाठी पैसे नाही असल्यावर जकात देऊ शकतात.* *♦️त्यानंतर आपला शेजारी असलेला ज्याच्याकडे दोन वेळचा जेवण बनवण्यासाठी लागणारा साहित्य घेण्यासाठी ही पैसे नसतील आणि त्याचा दोन वेळचा जेवण करण्यासाठी चूल पेटत नसेल तर त्याला जकात देऊ शकता, त्यानंतर आपल्या गल्लीतील (मोहल्ला) असा घर ज्याच्या घरात पुरुष कमावणारा कोणी नाही त्याची घरची परिस्थिती हालाखीची आहे त्याला जकात देऊ शकतात, मग त्यानंतर आपल्या गावातील गरीब,मिस्किन,यतीम(अनाथ),माजूर(कर्जदार),मजबूर(गरजवंत),बेवा(विधवा), गरीब मरिज(दवाखान्यासाठी), एखाद्या गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांच्या(शैक्षणिक शिक्षणासाठी) सुद्धा आपन जकात देऊ शकतात.* *♦️जकात देणे म्हणजे आपल्या जवळील मालमत्तेतून ठरवल्याप्रमाणे पैसा काढून गरिबांना वाटणे.* *♦️(जानकी जकात)अर्थातच घरातील प्रत्येक माणसाच्या जीवाची जकात म्हणजे एका माणसामागे १.७५०ग्रॅम म्हणजेच पावणे दोन किलो गहू घरातल्या प्रत्येक माणूस लहान असो किंवा मोठा पावणे दोन किलो गहू देणे म्हणजेच जान की जकात हे बंधनकारक आहे.* *♦️(माल की जकात)अर्थातच आपल्या मालमत्तेतील विषाणू काढून संपत्ती निरोगी करणे असा मानला जातो.* *♦️जकात गरिबांना वाटली जाते त्यामुळे गरीबवर्गातील लोक रमजान महिन्याचा फायदा व ईद चा आनंद घेऊ शकतात.* *♦️जकात म्हणजे काय आणि कसे उदा:-समजा तुमच्याकडे एक लाख रुपये आहे.त्याला २५००रुपये जकात देणे अनिवार्य आहे.* *♦️घरात साडे सात तोळे सोने आहे.आजच्या बाजार भावाने म्हणजे ८५००० हजार रुपये तोळे भावाने साडे सात तोळ्याचे आजच्या बाजार भावाने साडे सात तोळे सोने असलेल्याना १५९३७.५ हजार जकात अनिवार्य आहे.* *♦️भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, आजारी, गरजवंतांना मदत करावी, अशी कुरआनची शिकवण आहे.लोभ,व्याभिचार, अहंकार, अंधविश्वास आदींपासून दूर राहण्यास आणि अहिंसा, करूणा, शिक्षणाची संगत वाढविण्याची शिकवण दिली जाते. हा महिना वर्षभराचा मार्गदर्शक महिना आहे. त्यामुळे ईश्वराची कृपा व्हावी म्हणून कुरआन, नमाज पठण, रोजा केला जातो.* *♦️अशा वेळी कुणीही उपाशीपोटी रोजा करणार नाही, याची काळजी घेतली जाते.* *♦️आपल्या शेजारी किंवा गल्लीतील शाळेतील विद्यार्थी अशा व्यक्तींना सहरीसाठी अन्न उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी असते.* *♦️चुकीच्या गोष्टी कानाने ऐकू नये, डोळ्यांनी वाईट पाहू नये, वाईट शब्द कोणाबद्दलही बोलू नये हाताने चांगले काम करावे एकंदरीत वाईट टाळून सत्य मार्गावर वाटचाल करण्याचे नाव रोजा आहे.* *♦️रमजानच्या पवित्र महिन्यात (कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नये) मन शुद्ध(स्वच्छ) ठेवावे लागते.* *♦️उपवास करताना कोणासाठी ही चुकीचे विचार मनात येऊ नये हाच पवित्र रोजा आहे.* *♦️या पवित्र अशा रमजान महिन्यात गोरगरिबांना गरजूंना,गरजवंतांना, शक्य तितकी मदत करावी याचाच नाव रोजा आहे.* *♦️रमजान हा सण म्हणजे आनंदाचा आणि बंधू भावाचा.* *♦️महिनाभर उपवास झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद येते इस्लाम धर्माचा ईद हा सर्वात मोठा सण आहे.* *♦️ईदची नमाज झाल्यावर एकमेकांना गळाभेट करून ईदच्या एकमेकांना शुभेच्छा देतात आणि एकमेकांच्या घरी जाऊन गोड पदार्थ सुरकुंबा पितात म्हणूनच रमजान ईदला गोड ईद असेही म्हणतात.*
*♦️माझ्या तमाम मुस्लिम बांधवांना कळकळीची व हाथ 🙏विनंती आहे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका,सोशल मीडिया वरील फेसबुक,इंस्टाग्राम,ट्विटर व्हाट्सअप वर असे कोणतेही स्टेटस स्टोरी ठेवू नका आणि सोशल मीडियावर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल व शांतता भंग होऊन दंगल घडेल असे कोणतेही फोटो पोस्ट करू नका,लाईक,शेअर,फॉरवर्ड करू नका.* *ज्यामुळे आपला व आपल्या घरच्यांचा, कुटुंबांचा, जन्म दिलेल्या आई बापाचा व समाजाचा नाव बदनाम होईल माथेफिरूच्या नादाला लागून आपल्या कुटुंबाची राख रांगोळी करू नका.* *माणुसकी हाच खरा धर्म मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या.* *✍️ सोहेल फरास सामाजिक कार्यकर्ता अक्कलकोट ९०२१६४४०३०*