Police crime : मेसचे डबे पोहचविणाऱ्या महिलेला पोलिस हवालदाराने मागितली शरिरसुखाची मागणी ; उरुळी कांचन मधील घटनेने पोलिस दलाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह
पुणे (प्रतिनिधी): पुणे शहरात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अशातच आता पुण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने दारुच्या नशेत उरुळी कांचन येथील जेवणाचे डब्बे पुरवणाऱ्या एका महिलेकदे शरिरसुखाची मागणी केल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा दावा केला आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ देखील त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. या प्रकारामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.



गणेश रतन दाभाडे (बिल्ला क्र. ३२१) असे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. दाभाडे हा मेसचे डबे पोचवणाऱ्या महिलेकडे वर्दीचा धाक दाखवून शरीर सुखाची मागणी करत होता. महिलेने विरोध करताच त्याने आपला पवित्रा बदलला. संबंधित पोलीस स्टेशन महिलेची तक्रारही लिहून घेत नाही, असा आरोपही शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

दरम्यान उरुळी कांचनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, संबंधित महिलेची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.