गावगाथा

*अमोलराजे जन्मेजयराजे भोसले ग्रुपचा पै. अजम शेख याने “चांदीचा गदा” जिंकला 

*कर्नाटक राज्यातील अफजलपूर तालुक्यातील (जि. कलबुर्गी) येथील श्री क्षेत्र करजगी (क) श्री देवीच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या अंतिम निकाली कुस्ती स्पर्धेत

*अमोलराजे जन्मेजयराजे भोसले ग्रुपचा पै. अजम शेख याने “चांदीचा गदा” जिंकला 

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट:- (प्रतिनिधी)*
*कर्नाटक राज्यातील अफजलपूर तालुक्यातील (जि. कलबुर्गी) येथील श्री क्षेत्र करजगी (क) श्री देवीच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या अंतिम निकाली कुस्ती स्पर्धेत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले ग्रुपचा पै. अजम शेख याने “चांदीचा गदा” पटकविल्याने सर्वस्तरातून स्वागत व कौतुक होत आहे.*

HTML img Tag Simply Easy Learning    

सालाबादाप्रमाणे कर्नाटक राज्यातील अफजलपूर तालुक्यातील (जि. कलबुर्गी) येथील श्री क्षेत्र करजगी (क) श्री देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा घेण्यात येतात. घेण्यात आलेल्या निकाली कुस्ती मध्ये पै. अजम शेख व कर्नाटकचा पै. कुमार कमोजगी यास आसमान दाखवत पै. अजम शेख याने निकाली कुस्ती जिंकली आहे. पै. अजम शेख यांचे वस्ताद पै. मौला शेख (बादोला) यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सदरची चांदीची गदा नुकतेच अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते न्यासाच्या अतिथी कक्षात देण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

पै. अजम शेख याच्या विजयाबद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, न्यासाचे विश्वस्त,पै. अजम शेख यांचे वस्ताद पै. मौला शेख (बादोला), पै. महेश कुलकर्णी सर्व सदस्य, सेवेकरी, कर्मचारी यांच्यासह तालुक्यातून सर्वस्तरातून स्वागत व कौतुक होत आहे. या प्रसंगी निखील पाटील, ऋषी लोणारी सह कुस्तीगीर उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत न्यासाकडून दरमहा ७७ कीटचे वाटप करण्यात येते.

HTML img Tag Simply Easy Learning    

तालुक्यातील जे पैलवान कुस्ती सरावासाठी कोल्हापूर,पुणे, सोलापूर,धाराशिव,संभाजीनगर आदि ठिकाणी आहेत अशा कुस्तीगरांसाठी न्यासाकडून गत मकर संक्रांतीच्या दिवशी (जानेवारी महिन्यात) सदरचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. प्रारंभी ५० जणांना किट देण्यात आले होते.

गेली ३८ वर्षे अविरतपणे अन्नदानाचे स्वामीकार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे न्यास संपूर्ण देशात ख्यातनाम आहे. संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या कार्यास झळाळी प्राप्त झाली आहे. अन्नछत्र मंडळात दररोज लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.

याबरोबरच “समर्थ महाप्रसाद” सेवे बरोबरच आता तालुक्यातील गोरगरीब कुस्तीगीरांसाठी न्यासाकडून प्रसाद रुपी खुराकाचे वाटप प्रती महिन्यास करण्यात येत आहे. या कीटमध्ये कुस्तीगीरांना आवश्यक तूप, बदाम, खारीक, बडीसोप, खसखस, इलायीची, धने आदि पदार्थांचे कुस्तीगरांसाठी श्रींचा प्रसाद रुपी खुराकात या जीनंसांचा समावेश आहे.

तालुक्यातील कुस्तीगीर हे सरावाकरिता कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदि ठिकाणी कुस्तीचा सराव करीत आहेत. मात्र त्यांची गरज ओळखून तालुक्याच्या चांद्या पासून बांध्यापर्यंतच्या कुस्तीगरांचा एका विशेष टीमच्या माद्यमातून सर्वे करून तालुक्यातील ७७ पैलवानांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान याकामी महाराष्ट्र केसरी पै.मौला शेख बादोला, पै.महेश कुलकर्णी, सरफराज शेख, अतिश पवार यांचे सहकार्य लाभत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button