
सेवानिवृत्त अधीक्षक अजित भागवत यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने संपन्न

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी……..,


ज्येष्ठ नागरिक ग्रुप आरे वॉकर्स चे सभासद आणि कस्टम मधून निवृत्त झालेले अधीक्षक आणि सध्या सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असणारे अजित भागवत यांचा ७० वा वाढदिवस आरे कॉलनी येथे उपस्थित सभासदांनी वृक्षारोपण करून साजरा केला. यावेळी भागवत यांच्या हस्ते कल्पवृक्ष लावण्यात आला तर त्यांना स्वहस्ते बनविलेला बुके आणि पुस्तक देऊन सभासदांनी त्यांचासन्मान केला.सभासद प्रत्येक वेळी ज्याचा वाढदिवस असतो त्याच्या शुभहस्ते वृक्ष लावतात आणि नियमितपणे त्याची जोपासना करीत असतात.आतापर्यंत या ठिकाणी साधारण २५ ते ३० विविध जातींचे वृक्ष लावण्यात आले आहेत.वाढ दिवसाच्या निमित्ताने सर्वांना भागवत यांच्या वतीने इडली वडा चटणी देण्यात आली.

