*अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालवाड्:मय पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन*
प्रस्ताव सादर करणे बाबत


*अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालवाड्:मय पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन*
पुणे : सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत असलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणार्या विविध बालवाड्:मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सन 2024 या वर्षात प्रकाशित झालेले बालकादंबरिका, बालकथा, किशोरकथा, शिशुकथा, एकांकिका व विज्ञान, चरित्र, काव्य, बालनाट्य, विज्ञान साहित्य, ग्रंथसजावट, प्रकाशक, बालसाहित्य समीक्षा, स्वैर अनुवाद, ललित साहित्य, मुलांचे अप्रकाशित साहित्य, प्रथम प्रकाशन, बालदिवाळी अंक (3 कविता, 3 कथा) या व्यतिरिक्त बालसाहित्यावर विशेष संशोधन करणार्या लेखकास प्रोत्साहनपर अमरेंद्र गाडगीळ पुरस्कार देण्यात येणार आहे. वरील प्रकारचे साहित्य 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेले असावे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
लेखक तसेच प्रकाशकांनी पुस्तकांसह लेखकाचा परिचय व छायाचित्र पाठवावे. ग्रंथ 20 एप्रिल 2025 पर्यंत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, 202 बालाजी कॉम्प्लेक्स, बालाजीनगर, धनकवडी, पुणे 411043 या पत्त्यावर पोहोचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन पुरस्कार समिती सदस्य शिवाजी चाळक, सचिन बेंडभर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9834400481 या क्रमांकावर संपर्क साधावा.
