गावगाथाठळक बातम्या

PCMC : जनसुरक्षा कायद्याविरोधात पिंपरीत मविआ कडून आंदोलन ; “जन सुरक्षा कायदा हटाव, संविधान बचाव”चा नारा

HTML img Tag Simply Easy Learning    

चिंचवड (प्रतिनिधी) : पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महाविकास आघाडी आयोजित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श.प., शिवसेना (उबाठा) व इतर घटक पक्षांच्या वतीने जन सुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

लोकशाहीची हत्या व गळा घोटणारे हे विधेयक नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली करणारे आहे. तेव्हा सरकारने अशा प्रकारचे विधेयक लागू न करता ते रद्द करावे यासाठी हा महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षाने पिंपरी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत या आंदोलनात सहभागी झाले.

HTML img Tag Simply Easy Learning    

काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तुषार कामठे, देवेंद्र तायडे, सुलक्षणा शिलवंत-धर, ज्योती निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त करून जाहीर निषेध केला.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, बाबासाहेब बनसोडे, युवक काँग्रेसचे प्रवक्ते गौरव चौधरी, धम्मराज साळवे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, सागर चिंचवडे, रोमी सिंधू, विश्वनाथ जगताप, हरीश नखाते, विठ्ठल शिंदे, सुशीला पवार, रजनी वाघ, माधव धनवे पाटील, मयूर जाधव, संतोष कवडे, ज्योती भालके, दस्तगीर मनीयार, सचिन देसाई, सोनल नांदगुडे, संगिता जाधव, अशोक मोरे, अबूबकर लांडगे, सोमनाथ शेळके, अर्चना राऊत, जन्नबी सय्यद, आशा भोसले, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, बबिता ससाणे, मिलिंद फडतरे, सतीश भोसले, पीर मोहम्मद पठाण, दीपक भंडारी, चंद्रकांत लोंढे, ॲड. अशोक धायगुडे, सोनू शेख, आकाश शिंदे आदींसह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button