गावगाथा

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी सपत्नीक घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन.

प्रथमेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी प्रथमेश इंगळे यांचा केला सत्कार.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी सपत्नीक घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन.

प्रथमेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी प्रथमेश इंगळे यांचा केला सत्कार.

(श्रीशैल गवंडी, )अ.कोट.
गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे औचित्य साधून आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्नीक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आमदार सचिन दादा
कल्याणशेट्टी व त्यांच्या सुविद्य पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांचा श्री स्वामी समर्थांचे
कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी कल्याणशेट्टी कुटुंबीयांच्या वतीने प्रथमेश इंगळे यांचा शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन व केक कापून प्रथमेश इंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला व प्रथमेश इंगळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव शिंदे, नागेश कुंभार, ननू कोरबू, मोहन सोहनी, अविनाश मडीखांबे, लखन झम्पले, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, प्रसाद सोनार, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – प्रथमेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, शांभवी
कल्याणशेट्टी, महेश इंगळे, अविनाश
मडीखांबे व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button