जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने केली श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व परिसराची पाहणी.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत श्री.वटवृक्ष मंदिर परिसराची पाहणी करण्याचा घेण्यात आला होता निर्णय.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने केली श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व परिसराची पाहणी.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत श्री.वटवृक्ष मंदिर परिसराची पाहणी करण्याचा घेण्यात आला होता निर्णय.

श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा मंदिर समितीने घेतला निर्णय.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.११/४/२०२५) राज्यातील अनेक भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी भक्तांची स्वामी दर्शनाकरिता हल्ली गर्दी वाढतच आहे. गर्दीमध्ये भाविकांना सुलभ स्वामी दर्शन होणेकामी मंदिर समितीच्या वतीने वेळेवेळी विविध उपाय योजना राबविण्यात येत असतातच. यापुढील काळातही व येत्या श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवरही भाविकांना सुलभ स्वामी दर्शन होण्यासाठी मंदिर समिती विविध उपाययोजना राबवून नेहमीच भाविकांच्या सुलभ स्वामी दर्शनासाठी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसह मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे,
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव शाम मोरे, विश्वस्त अभय खोबरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट दिली. यावेळी गर्दीच्या परिस्थितीचा आढावा घेवून मंदिरातील सकाळी ११:३० ची नैवेद्य आरती प्रसंगी नेहमीप्रमाणे दर्शनापासून भाविकांना थांबवण्यात आलेला कालावधी व आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी सोडतानाच्या काळात मंदिरातील व मंदिरा बाहेरील परिसराची व भाविकांच्या गर्दीची पाहणी केली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांना काही विशेष सूचना केल्या. यावेळी महेश इंगळे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) सुमित शिंदे, तहसिलदार विनायक मगर, डीवायएसपी विलास यामावार, अक्कलकोटचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या उपस्थितीत हा मंदीर परिसर पाहणी दौरा पार पडला. पुढे बोलताना महेश इंगळे यांनी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद साहेब यांच्या अध्यक्षतेखालील समितीने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन आज प्रत्यक्ष मंदीर परिसर व भाविकांच्या गर्दीची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. नुकतेच संपन्न झालेल्या
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत बोलताना महेश इंगळे यांनी लॉकडाऊन नंतर श्री स्वामी समर्थांच्या भक्तगणांची संख्या खूप वाढलेली आहे. स्वामी भक्तांची गर्दी पाहून मंदिर समितीच्या वतीने वेळोवेळी विविध उपाय योजना राबवून सर्व स्वामी भक्तांना सुलभ स्वामी समर्थांचे दर्शन कसे होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत असते, परंतु अलीकडील वाढत असलेली गर्दी पाहता तसेच मंदिराची व परिसराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता स्वामी भक्तांच्या वाढत्या गर्दीच्या संख्येच्या तुलनेत मंदिर परिसराची जागा खूपच अपुरी पडत आहे. मंदीर समितीच्या उपलब्ध आहे त्या जागेत मंदिर समितीने विविध पद्धतीने सर्व स्वामी भक्तांना दर्शन सुलभ कसे मिळेल याची विश्वस्त समिती सदस्यांशी नेहमीच विचार विनिमय करून स्वामी भक्तांना सुलभ स्वामी दर्शनाची व्यवस्था केली जाते. आता देवस्थान लगतच असलेल्या देवस्थान संचलित मुरलीधर मंदिर या जागेत भाविकांच्या सोयीकरिता सुसज्ज भक्तनिवास व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता दर्शन रांगेचे बांधकाम हाती घेण्यात आलेले आहे. याचाही महेश इंगळे यांनी या बैठकीत विशेष खुलासा केला. या बैठकीत महेश इंगळे यांचे म्हणणे ऐकून घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदिर विश्वस्त समितीचे प्रमुख महेश इंगळे व विश्वस्तांशी चर्चा करून मंदिर परिसराची पाहणी करावी १० दिवसात पुढील सुचना करू असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीला व मंदीर समितीला दिले होते, त्यास अनुसरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व प्रांताधिकारी सुमित शिंदे यांच्या सूचनेनुसार मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी यांच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्णय मंदिर समितीने घेतला असल्याचे स्पष्टीकरण दिले. यावेळी
तहसीलदार विनायक मगर, मुख्याधिकारी रमाकांत डाके, पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावार, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, सेक्रेटरी आत्माराम घाटगे, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, ऋषिकेश लोणारी, प्रवीण देशमुख इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर व परिसराची पाहणी करताना प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार विनायक मगर, डीवायएसपी विलास यामावार, महेश इंगळे, प्रथमेश इंगळे,
व अन्य दिसत आहेत.
