श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेला यंदा २९ लाख ९३ हजार रुपयाचा नफा ( मुरूम प्रतिनिधी) : येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था म. मु रुम येथील बसव सहकार भवन या इमारतीत सोमवारी (ता. ७) दुपारी ४ वाजता पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. ३१ मार्च २०२५ च्या तेरीज पत्रक नफातोटा, ताळेबंध या आर्थिक पत्रकावर चर्चा करण्यात आली. . पतसंस्थेचे यंदाचे १५ वे वर्ष असून यंदाच्या आर्थिक वर्षात पतसंस्थेस २९ लाख ९३ हजार ८२८ रुपयाचा निव्वळ नफा झाला आहे. या पतसंस्थेकडे यंदा १३ कोटी ४० लाख ७२ हजार ९४९ रुपयाच्या ठेवी आहेत. संस्थेने यंदाच्या आर्थिक वर्षात १० कोटी ९९ लाख ४९ हजार १३३ रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची इतर बँकेत गुंतवणूक ४ कोटी ८३ लाख ८२ हजार २४२ रुपये. सदर आर्थिक वर्षात १८ कोटी ३२ लाख २५ हजार ५३२ रुपये उलाढाल झाली आहे. या पतसंस्थेचे मार्च अखेर ४१८२ सभासद आहेत. संस्थेच्या स्थापनेपासूनच ऑडीट वर्ग ‘अ ‘ दर्जा प्राप्त असून संपूर्ण संगणकीकृत आहे. सध्या पतसंस्थेची वाटचाल शासकीय धोरणानुसार कॅशलेस व्यवहाराकडे चालू आहे. सात वर्षापासून आर. टी. जी. एस. / एन. एफ. टी. ची सुविधा चालू असून मोबाईल बॅकिंगचा सभासद लाभ घेत आहेत. व्यवहार करताक्षणी एस.एम.एस.सभासदाना प्राप्त होतो. ठेवीच्या अनेक योजना असून यात महालक्ष्मी लखपती योजना, गणेश युवा मंगल योजना, स्वप्नपुर्ती योजना, सरस्वती मासिक प्राप्ती ठेव योजना, स्वामी विवेकानंद ठेव योजना, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शिक्षण ठेव योजना, सीता स्वयंवर ठेव योजना, महात्मा बसवेश्वर लखपती ठेव योजना आदी चालू आहेत. महावितरण कंपनीचे वीज बील भरणा केंद्र, ११ टक्के सोने तारण कर्ज तर ११.५० टक्के वेअर हाऊस तारण, १३ टक्के गहाण कर्ज, १४ टक्के सामान्य कर्ज आदी सोयी ग्राहकांच्या फायद्यासाटी संस्थेकडून पुरविल्या जातात. संस्थेकडे स्वत:ची स्वतंत्र लाॅकर उपलब्ध करुन दिले आहे. टाटा कं. चे सोलार कार्यान्वित केले आहे. या बैठकीत पतसंस्थेचे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव, संचालक अशोक जाधव, अमृत वरनाळे, मनिष मुदकण्णा, श्रीशैल बिराजदार, मनोज बोंदर, इंद्रजित लोखंडे, श्रीशैल मायाचारी, सौ. मनिषा पवार सौ. कलावती बिराजदार, शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, कॅशिअर चिदानंद स्वामी, धीरज मुदकण्णा, प्रशांत काशेट्टे, सचिन कंटेकूरे, सौ नेहा शेवाळकर पिग्मी एजन्ट संतोष मुदकण्णा, महातंय्या स्वामी, गुंडेराव गुरव आदींसह कर्मचारीवृंद व सभासद यांच्या सहकार्यांने पतसंस्था यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. यंदा ठेवीमध्ये वाढ, थकीत कर्जदारांवर कडक कार्यवाही करून वसुली करण्यात येत असून यंदाचा सोळावा वर्धापन दिन १२ मे रोजी होणार असल्याचे चेअरमन शिवशरण वरनाळे यांनी माहिती दिली.