महात्मा फुले यांच्या कार्यामुळे समाज परिवर्तनास गती मिळाली ; मल्लिनाथ कल्याणशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम

महात्मा फुले यांच्या कार्यामुळे समाज परिवर्तनास गती मिळाली ; मल्लिनाथ कल्याणशेट्टी

कल्याणशेट्टी महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम

अक्कलकोट

महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, अस्पृश्य उद्धार, शेतकरी व शेतमजूर यांना न्याय देण्याची भूमिका घेतल्यामुळे समाजपरिवर्तनास गती मिळाली असे मत मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील इतिहास विभागाने आयोजित केलेल्या महात्मा फुले जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापिका मधुबाला लोणारी यांनी केले. सूत्रसंचलन प्रा डॉ शितल झिंगाडे-भस्मे यांनी केले तर आभार प्रा भीम सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा मनीषा शिंदे, प्रा जनाबाई चौधरी, प्रा शीतल फुटाणे, प्रा प्राची गणेचारी आदी उपस्थित होते.
चौकटीतील मजकूर
महात्मा फुले यांना भारतरत्न ही सर्वोच्च पदवी देऊन सन्मानित करावे.
पुणे येथील भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षिका म्हणून योगदान दिल्यामुळे महिला सक्षम झाल्या. त्यांच्या समग्र कार्यामुळेच देशाचा विकास झाला. त्यामुळे त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पदवी देऊन सन्मानित करावे असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.
फोटो ओळ
इतिहास विभाग आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांना अभिवादन करताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर