गावगाथा

नागणसुर येथील श्री गुरू बसवलिंगेश्वर शिक्षण कला व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेचे उपक्रम

नागणसुर कन्नड शाळेत बसव कलामंच नामकरण व लोकार्पण सोहळा संपन्न

नागणसुर येथील श्री गुरू बसवलिंगेश्वर शिक्षण कला व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेचे उपक्रम
नागणसुर कन्नड शाळेत बसव कलामंच नामकरण व लोकार्पण सोहळा संपन्न
अक्कलकोट -(प्रतिनिधी)
नागणसुर येथील श्री गुरू बसवलिंगेश्वर शिक्षण कला व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी बसव कलामंच बांधून नामकरण व लोकार्पण सोहळा डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजींच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या दिव्य सानिध्य डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामिजी भूषविले होते.अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक शेतकरी सोसायटीचे चेअरमन बसनिंगप्पा थंब होते.उपाध्यक्षस्थानी गावचे माजी उपसरपंच धनराज धनशेट्टी होते.व्यासपीठावर प्रसाद प्रचंडे,बसवराज नागलगांव, शशिकांत कळसगोंडा,बसवराज मंटगी, विश्वनाथ प्रचंडे,बसवराज खिलारी, धरेप्पा तोळणूरे,सिद्धाराम शिवमूर्ती आदी उपस्थित होते.
प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर भोसगी, बसनिंगय्या स्थावरमठ यांच्या हस्ते श्री.बसवलिंगेश्वर महास्वामिजी आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजनाने सुरुवात झाली. बसव कलामंचाच्या पूजन गुरुराज विभुते,प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजींच्या हस्ते नामकरण व लोकार्पण करण्यात आले.
डॉ.बसवलिंग महास्वामिजी पुढे बोलताना म्हणाले की,आयुष्यात जन्म दिलेल्या आई व जन्म झालेला भूमी सर्व श्रेष्ठ आहे.म्हणून जन्मदाते आणि जन्मभूमीला कधीही विसरू नये या उदात्त भावनेने संस्थेचे लोक एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कलामंच बांधून दिले असून भविष्यात याच कलामांचातून देशाचे सर्वश्रेष्ठ कलाकार,उत्तम वक्ता तयार होतील या कार्य प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे असे कौतुक केले. बसव कला मंचाचे बांधकाम साठी लागणारे साहित्य गुरुराज विभूते यांनी त्यांच्या वडील कै.बसलिंगप्पा गुरबसप्पा विभूते यांचे स्मरणार्थ मोफत दिले. प्रकाश पाटील यांनी देणगी बरोबर मोफत फरशी दिलें. श्री गुरु बसवलिंगेश्वर शिक्षण कला व क्रीडा बहुउद्देशीय संस्था, नागणसूर येथे प्रामाणिकपणे काम करत असल्याचे मत तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष मल्लिनाथ कल्याण यांनी व्यक्त केले. संस्थेचे सदय राजू नाविंदगी, राजकुमार गुरव, गुरुबाई प्रचंडे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शरणप्पा फुलारी यांनी केले. प्रस्तावना संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.धरेप्पा नागणसुरे यांनी केले. शेवटी संस्थेचे सचिव प्रा. बसवराज विभूते यांनी आभार मानले.कन्नड मुली शाळेच्या विद्यार्थिनी स्वागत गीत आणि ईशस्थवन सादर केले.दोन्ही शाळेतील विद्यार्थी विविध मनोरंजनाची कार्यक्रम करून कलामंचाचे औपचारिक उद्घाटन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रीय मुख्याध्यापक विद्याधर गुरव,श्रीशैल दोडमनी,बसवराज स्वामी,राजकुमार खानापुरे,राजकुमार नरूणे,लक्ष्मीकांत तळवार ,शिवशरण म्हेत्रे,खाजप्पा कीणगी, शरणप्पा फुलारी,राजशेखर कुर्ले,शांता तोळणूरे,विजयश्री एंटमन, चन्नम्मा बिराजदार संस्थेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button