प्रत्येक नागरिक बाबासाहेबांचा ऋणी आहे ; मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे
जि .प .प्राथमिक मराठी शाळा वागदरी या शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

प्रत्येक नागरिक बाबासाहेबांचा ऋणी आहे ; मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे
जि .प .प्राथमिक मराठी शाळा वागदरी या शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
येथील.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुसया कलशेट्टी होत्या .क्रांतीसूर्य डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन मुख्याध्यापिका रेखा लक्ष्मण सोनकवडे यांनी केले.कार्तिक बनसोडे हा डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेत आला होता .विद्यार्थ्यानी माहिती सांगितली .डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामजिक समता सप्ताह शाळेत साजरा करण्यात आला होता .भारतीय संविधान उद्देशिका वाचन जनजागृती वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा ज्योतिबा फुले जयंती व्याख्यान मार्गदर्शन चर्चासत्रे डॉ .बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान इत्यादी विविध कार्यक्रमाने सामजिक सप्ताह सर्व शिक्षकांनी मिळुन साजरा केला .त्यासंदर्भात तोलन बागवान यांनी माहिती सांगितली . माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी .त्यांचे कार्य अनेक क्षेत्रात पसरलेले आहे ज्यात सामाजिक न्याय शिक्षण बौध्द धर्म आणि भारतीय राज्यघटना यासारख्या महत्वाच्या क्षेत्राचा समावेशा आहे त्यांनी दलित बौध्द चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांना होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली .महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले . स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौध्द धर्माचे पुनरुज्जीवक होते . कुशाग्र आणि तल्लख बुद्धी असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतरत्न यांचे कार्य अलौकिक आहे .समाजातील प्रत्येक जातीतील गरीब सामान्य जनतेचे नेते होते विरोध हा विषमतेला अन्यायाला होता .कोणत्याही एका जातीधर्माला नव्हता म्हणूनच बाबासाहेबांचे सर्व जातीधर्मातील विषमता नष्ट करून समानता प्रस्थापित करणारे महान नेते होते .प्रत्येक नागरिक या महामानवाचा ऋणी आहे .हे न फिटणारे कर्ज आहे .डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणात आम्ही कायमच असणार असे आदरयुक्त वक्तव्य मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी व्यक्त करत विनम्र अभिवादन केले .अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजात डॉ .बाबासाहेब यांचा जन्म झाला अन अवघ्या पाच वर्षाचे असताना आई भिमाबाईचे निधन झाले त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांची आत्या मीराबाईनी केले .हुशार व्यक्तिमत्व लाभलेले डॉ .भीमराव आंबेडकर यांनी भरपूर अभ्यास करून देशात सर्वोच्च स्थान मिळवित समाजातील दरी दूर केली .महान कार्य केले असे मार्गदर्शन करताना रत्नाबाई रेऊरे म्हणाल्या .मनिषा कुणाळे यांनी पण त्यांच्या बालपण शिक्षण पदव्या याविषयी माहिती दिली प्रमुख पाहुणे वक्ता मारुती शिंदे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सम्पूर्ण जीवनक्रम व समाजाप्रती केलेले कार्य याविषयी माहिती दिली उमेश बनसोडे यांनी महामानव क्रांतिसूर्य भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती सांगितली . अनुसया कलशेट्टी यांनी भारतरत्न महामानव डॉ .भीमराव रामजी सपकाळ यांच्याविषयी माहिती दिली .आंबेडकर आडनाव कसे मिळाले दलितांना मिळत असलेली वागणूक त्यातून आंबेडकरांचे कार्य याविषयी सांगितले .तोलन बागवान यांनी आभार मानले .याप्रसंगी रेखा सोनकवडे अनुसया कलशेट्टी तोलान बागवान रत्नाबाई रेऊरे मनिषा कुणाळे हे शिक्षक उपस्थित होते .पालकांनी उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले .
