डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र ग्रंथाचे चिंतन व्हावे : मल्लिनाथ कल्याणशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र ग्रंथाचे चिंतन व्हावे : मल्लिनाथ कल्याणशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम
अक्कलकोट :
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर समाजातील वंचित, उपेक्षित व दलित समाजाला न्याय मिळावा म्हणून संघर्ष केला. युवकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. म्हणून त्यांच्या चरित्र ग्रंथातून आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी उच्चविद्याविभूषित व्हावे, असे मत मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, डॉ आंबेडकर यांनी दुर्मिळ ग्रंथांचे वाचन केले, स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविले. भारताचे संविधान लिहून विद्वत्ता सिद्ध केली. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणले होते. दलित समाजातील मुलांना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. शितल झिंगाडे-भस्मे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. मधुबाला लोणारी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. बाळासाहेब पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास प्रा मनीषा शिंदे, प्रा विद्या बिराजदार, स्वप्नाली जमदाडे,विकास तळवार आदी प्राध्यापक उपस्थित होते.

चौकटीतील मजकूर

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकाकडून मानवंदना

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मानवंदना देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. राजशेखर पवार उपस्थित होते.

फोटो ओळ
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी शिक्षक व विद्यार्थी