“*पालखी मिरवणुकीने श्री रामलिंगेश्वर यात्रेला प्रारंभ “* श्री क्षेत्र तीर्थ (ता. द. सोलापूर )दि. 14 येथील श्री रामलिंगेश्वर यात्रेला सोमवारी भक्तिमय व उत्साही वातावरणात सुरुवात झाली. ढोल तासे, सनईच्या मंगलमय सुराने आणि हलगीचा कडकडाडात नंदिध्वज मिरवणूक संपन्न झाली. गावातील तरुण मंडळाचा सहभाग हिरीरीने होता.राजेंद्र माणिक जाधव.यांच्या वतीने महाप्रसाद सेवा करण्यात आली होती. सायंकाळी विद्युत रोशणाईने मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. देवस्थानाचे पुजारी डॉ. सुभाष गुरव, पुण्याचे उद्योजक मारुती जाधव, प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार, ऍडव्होकेट शंकर जाधव,शिवराज बिराजदार, उल्हास पाटील, रामलिंग चितले, भीमाशंकर रोडगे, प्रा. प्रभुलिंग वळसंगे, विश्वनाथ पावले,श्रीशैल बिराजदार, राम पुजारी, विठ्ठल चितले, रामलिंग उदंडे, संगप्पा उदंडे,रेवणसिद्ध पाटील, मैनूद्दीन मुल्ला, उप सरपंच पैगंबर मुल्ला, राजकुमार गुरव, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर भाविकांनी मंदिरापर्यंत दंडवत घालून नवस फेडला. महाप्रसाद घेऊन आज भाविकानी समाधान अनुभवला.