सार्थक बाविकर यांच्या भक्तीसंगीताने रंगला वटवृक्ष मंदीरातील धर्मसंकीर्तन महोत्सव.
भक्ती संगीतसेवा प्रारंभी महेश इंगळे यांच्या हस्ते सार्थक बाविकर व सहकलाकारांचा सन्मान.
(श्रीशैल गवंडी, दि.१६/०४/२०२५.अ.कोट)
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४७ व्या पुण्यतीथी उत्सवातील धर्मसंकीर्तन महोत्सवात तिसऱ्या पुष्पातील द्वितीय सत्रात सोलापूरचे गायक सार्थक बावीकर, राजेश बावीकर व सहकलाकार यांचा भक्तीसंगीत गायनसेवा कार्यक्रम मोठ्या उत्सहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सार्थक बावीकर व सहकलाकारांनी राग यमन मधील गुरू चरण लागो ही गुरू महिमा सांगणारी बंदिश सादर केली. त्यानंतर तुझ्या कृपेने, गुरू परमात्मा परेशु, अक्कलकोट स्वामींची पालखी,नाम स्वामींचे येता माझ्या ठाई रे
दत्ताची पालखी, पद्मनाभा नारायणा, ध्यान लागते रामाचे, पंढरी निवासा सख्या पांडुरंग, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, माझी आई अक्कलकोटी, सुखाचे जे सुख, श्रीपाद वल्लभ दिगंबरा इत्यादी भावगीत, भक्तीगीते सादर करुन उपस्थित श्रोत्यांकडून भरघोस दाद मिळवले व या भक्ती संगीताने धर्मसंकीर्तन महोत्सवातील तिसरा आध्याय रंगवित श्री स्वामी समर्थांच्या चरणी आपली सेवा समर्पण केली. या गायन व भक्ती संगीत सेवेत गायक सार्थक बावीकर व आदिती कुलकर्णी, पुजा परकीपंडला, श्रद्धा मोरे या
सहगायकांना हार्मोनियमवर शर्वरी कुलकर्णी, तबल्यावर झंकार कुलकर्णी, रूपक कुलकर्णी, तालवाद्यवर कौस्तुभ चांगभले, व्हायोलिनवर ज्येष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे यांनी साथ उत्कृष्ट संगत केली. कार्यक्रमाच्या सुरवातीस ओंकार पाठक यांनी प्रास्ताविक व सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी सार्थक बाबीकर, राजेश बाबीकर व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. कार्यक्रमाचे निवेदन धनश्री बावीकर यांनी केले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्यासह सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, बाजीराव शिंदे, दत्तात्रय बाबर, शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, शिवपुत्र हळगोदे, सुनिल कटारे, मनोज इंगुले, श्रीशैल गवंडी, धनराज स्वामी, दर्शन घाटगे, बंडोपंत घाटगे, आदीत्य गवंडी, मोहन जाधव, स्वामीनाथ लोणारी, प्रकाश कासेगांवकर, अभिषेक गवंडी, सागर गोंडाळ, ज्ञानेश्वर भोसले, अविनाश क्षीरसागर, चंद्रकांत गवंडी, गिरीश पवार, सचिन हन्नूरे, लखन सुरवसे, सिध्दार्थ थंब, विजयकुमार कडगंची, काशिनाथ इंडे, रविराव महिंद्रकर, खाजप्पा झंपले, महेश मस्कले, संतोष पराणे, प्रसाद सोनार, संतोष जमगे, महादेव तेली यांच्यासह राज्याच्या कानाकोपरयातून आलेले बहुसंख्य स्वामी भक्त उपस्थित राहून या भक्ती संगीत श्रवण सेवेचा लाभ घेतला.
फोटो ओळ – भक्ती संगीत कार्यक्रम सादर करताना सार्थक बावीकर व सहकलाकार दिसत आहेत.