श्री वटवृक्ष देवस्थान समितीचे धार्मिक कार्य, सेवा, उपक्रम उल्लेखनीय – खा.सुनिल तटकरे
धर्मसंकीर्तन महोत्सव म्हणजे हिंदू धर्मप्रसार व आध्यात्म कार्याचे प्रसारक.
श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दर्शन घेतल्यानंतर खासदार सुनिल तटकरे यांचे मनोगत.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.१७/०४/२०२५) – श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे स्वामींचे वास्तव्य असलेले जागृत स्थान आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीतून अनेक भाविकांना विविध माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती येत आहे. स्वामींचे हे आशीर्वाद स्वामी दर्शनाच्या माध्यमातून भाविकांना तात्काळ पुरविण्याचे काम श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे प्रमुख महेश इंगळे हे अत्यंत सेवाभावी वृत्तीने सांभाळत आहेत. स्वामींच्या या वटवृक्ष मंदिरात वेळोवेळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असतात. हे माझ्या स्मरणात आहे. आता श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित करण्यात आलेले धर्मसंकिर्तन महोत्सव म्हणजे हिंदू धर्मप्रसार व अध्यात्म कार्याचे प्रसारक कार्य असल्याचे सांगून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे धार्मिक कार्यसेवा व उपक्रम उल्लेखनीय असल्याचे मनोगत राष्ट्रवादी पक्षाच्या अजीत दादा पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी खासदार सुनील तटकरे व त्यांचे चिरंजीव आमदार अनिकेत तटकरे व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र व प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला व श्री स्वामी समर्थांच्या१४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाची निमंत्रण पत्रिका दिली. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे बोलत होते. पुढे बोलताना खासदार तटकरे यांनी महेश इंगळे हे प्रत्यक्ष मंदीरातील वटवृक्षाखाली तासंतास उभे राहून प्रत्येक भक्तांना मोफत व सुलभ स्वामींचे दर्शन कसे मिळेल याचे अत्यंत तळमळीने नियोजन करित असतात. महेश इंगळे यांच्या या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची ही निस्वार्थ सेवाही उल्लेखनीय बाब असल्याचे मनोगत व्यक्त करून श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे सर्व स्वामी भक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रथमेश इंगळे, मिलन कल्याणशेट्टी, केदार माळशेट्टी, दिलीप भाऊ सिद्धे, माळी, शिवा स्वामी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, विपुल जाधव आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – खा.सुनिल तटकरे, आ.अनिकेत तटकरे व कुटूंबियांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, मिलन कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.