अन्नछत्र मंडळात आवारात ‘गणेश मंदिर यात्री थांबा’ ह्या निवासी इमारतीचे नूतनीकरण उद्घाटन मुलुंड मुंबईचे स्वामी भक्त चंद्रकांत पाटील आणि ठाण्याचे अनिल पाटील यांचे संपन्न
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2022/12/IMG-20221202-WA0040-780x470.jpg)
*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या आवारात ‘गणेश मंदिर यात्री थांबा’ ह्या निवासी इमारतीचे नूतनीकरण उद्घाटन मुलुंड मुंबईचे स्वामी भक्त चंद्रकांत पाटील आणि ठाण्याचे अनिल पाटील यांचे शुभहस्ते पार पडले.*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
या कार्यक्रमास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, न्यासाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, खजिनदार लाला राठोड, अप्पा हंचाटे, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, अभियंता अमित थोरात, बाबुशा महिंद्रकर, महादेव अनगले, गोटू माने, बाळासाहेब पोळ, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज निकम यांनी केले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
*चौकट :*
*स्वामी भक्तांची उत्कृष्ठ व्यवस्था :*
सदराचा इमारतीत १२ AC खोल्या असून यामुळे परगावच्या स्वामी भक्तांना उत्तम सोयीसुविधा उपलब्द करण्यात आले असल्याचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी सांगितले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)