अक्कलकोट सी बी खेडगी महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन ” निमित्य ” एक तास ! माझी वसुंधरा ‘ सहवास ” अभियान उत्साहाने साजरा..
दिन विशेष

अक्कलकोट सी बी खेडगी महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन ” निमित्य ” एक तास ! माझी वसुंधरा ‘ सहवास ” अभियान उत्साहाने साजरा..

अक्कलकोट —सी बी खेडगी महाविद्यालयात संस्थेचे चेअरमन सन्माननीय श्री बसलिंगप्पा खेडगी साहेब यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे अभ्यासू प्राचार्य डॉ. शिवराय आडवितोट यांच्या मार्गदर्शनानुसार व आमच्या भगिनी उपप्राचार्य सौ वैदेही वैद्य मॅडम यांच्या विशेष सहकार्याने अर्थशास्त्र विभाग वतीने सुरू करण्यात आलेला ( PM – USHA ) अंतर्गत “आधुनिक कृषी उत्पादन व व्यवस्थापन ” प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि ” २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन ” निमित्य ” एक तास ! माझी वसुंधरा ‘ सहवास ” अभियान अंतर्गत ” कृषी संस्कृती ! भारतीय संस्कृती ! ” वनसंपत्ती हीच एकमेव कृषी संपत्ती ” आणि ” माझी वसुंधरा ! निरोगी जीवनाचा एकमेव शाश्वत झरा ! या विविध महत्वपूर्ण विषयांवर महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष पर्यवेक्षक प्रा. संजय कलशेट्टी व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणपतराव कलशेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.



त्यांनी आपल्या मनोगत मध्ये हा अभियान एक तास एक दिवस असा न आयोजित करता संपूर्ण सकारात्मक आणि स्पर्धात्मकपणे आचरणयुक्त आयोजनावर लक्ष केंद्रित करावेत. असे महत्त्वपूर्ण गुणात्मक मत व्यक्त केले.याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी श्री रेवणय्या मठपती श्री रोहन राठोड कुमारी अंकिता होटकर कुमारी ऐश्वर्या पाटील इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास शिक्षकेतर कर्मचारी श्री परमेश्वर कलबुर्गी हे उपस्थित होते. आणि अभियानाचे सूत्रसंचालन कुमारी आशाराणी पाटील यांनी केले.तर अभियान यशस्वी करण्यासाठी अर्थशास्त्र विभागातील आमच्या भगिनी प्रा.सौ संध्या इंगळे मॅडम व विद्यार्थी श्री रोहित नडगम श्री अर्जुन गायकवाड श्री समर्थ वाघमोडे श्री पुजारी श्री पवन भोसले आणि विद्यार्थिनी कु. प्रियंका ढंगे कु. सुचिता गोरसे कु.भाग्यश्री सलगरे कु. निकिता कोळेकर कु. साक्षी विभुते इत्यादींनी अधिक परिश्रम घेतले. या अभियानाचा समारोप ” वृक्ष संवर्धन ” शपथेनी करण्यात आले. या अभियानामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी बंधू भगिनी अधिक संख्येने उपस्थित होते.
