महात्मा बसवेश्वर समतावादी युगाचा प्रवर्तक – डॉ. श्रीपाल सबनीस
बसव सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने लिंगायत दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न

महात्मा बसवेश्वर समतावादी युगाचा प्रवर्तक – डॉ. श्रीपाल सबनीस

बसव सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने लिंगायत दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न


पुणे — अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ साहित्यीक शरण डॉ श्रीपाल सबनीस सर यांच्या हस्ते लिंगायत दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पुण्यातील बाजीराव रोड वरील महात्मा बसवेश्वर पुतळा समोर छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सबनीस सरांनी संतसाहित्य,इतर महापुरुष यांच्यासोबत महात्मा बसवण्णा यांची कृतिशील तुलनात्मक मांडणी त्यांनी केली.यावेळी ते म्हणाले जगाने आदर्श घ्यावा आणि येणाऱ्या कित्येक पिढ्याना मार्गदर्शक ठरतील अशी नीतिमूल्ये बाराव्या शतकात विश्वगुरु बसवण्णा यांनी दिले असे गौरवउद्गार त्यांनी काढला पुढे म्हणाले जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांचे १२ व्या शतकात आध्यात्मिक, वैचारिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात मोठं योगदान आहे.बसवेश्वरांनी वयाच्या ८ व्या वर्षी उपनयन संस्कारचे जानवे तोडून आपल्या मुंज विधीला नकार दिला.परिणामी म. बसवेश्वरांना आपल्या घराचा त्याग करावा लागला. मानवा-मानवात भेदाभेद करून जातीयता निर्माण करणं सामाजिक एकात्मतेला मारक आहे,असे त्यांचे ठाम मत महात्मा बसवेश्वरांनी मांडला तसेच
मनात भक्तिभाव बाळगा,कर्मकांड करू नका कष्टकऱ्यांना कमी लेखू नका, हा मोलाचा उपदेश त्यांनी लोकांना दिला.कायकवे कैलास म्हणजे कर्म करण्यातच स्वर्ग आहे, हा विचार त्यांनी समाजाला दिला. कोणतेही काम कमी प्रतीचे वा उच्च प्रतीचे नसते. कुठलीही जात श्रेष्ठ वा कनिष्ठ नसते. सर्व मानव समान आहेत, हा उपदेश त्यांनी सर्वजातीय लोकांना दिला अशा विविध उदाहरणे देऊन डॉ सबनीस यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. लिंगायत दिनदर्शिका कॅलेंडर मांडणी उत्तम केले आहे त्यातील वचन इतर माहिती वाचनीय दर्जेदार आहेत.बसव सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष सर्व पदाधिकारी कौतुक करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजक
बसव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष माळशेटी उपस्थितांचे आभार मानले
