शिक्षण विस्तार अधिकारी वर्षा तडकलकर यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान.
वर्षा विजय तडकलकर यांचा श्री वटवृक्ष देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

शिक्षण विस्तार अधिकारी वर्षा तडकलकर यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान.

(अ.कोट, श्रीशैल गवंडी, दि.२४/०४/२५) येथील दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या होटगी बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारीपदी अक्कलकोटचे रहिवासी वर्षा तडकलकर यांची पदोन्नती झाली. या पदोन्नती प्रित्यर्थ वर्षा तडकलकर यांनी आज सहकुटुंब श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी पदी वर्षा तडकलकर यांची पदोन्नती झाल्याप्रित्यर्थ
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीच्या वतीने श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना महेश इंगळे यांनी वर्षा तडकलकर यांनी अत्यंत प्रामाणिक व जिज्ञासू वृत्तीने
अक्कलकोट नगरपालिकेत उपशिक्षक, पदवीधर, मुख्याध्यापक अशा विविध पदावर अत्यंत तळमळीने काम केले आहे. त्याचे फळ आज स्वामी समर्थांनी त्यांना दक्षिण सोलापूरच्या शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नतीच्या माध्यमातून दिले आहे. अक्कलकोट नगरपालिका इतिहासात शिक्षकामधून शिक्षण विस्तार अधिकारी होण्याचा मान आज वर्षा तडकलकर यांना मिळाला. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करून आज येथे श्री स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद व कृपावस्त्र देऊन सन्मान करण्यात आला असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विजय तडकलकर, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, सुनील पवार, चंद्रकांत गवंडी, बाळासाहेब एकबोटे, सुनील कटारे, मनोज इंगुले, श्रीशैल गवंडी, ज्ञानेश्वर भोसले, विपुल जाधव, गिरीश पवार आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – वर्षा विजय तडकलकर यांचा श्री वटवृक्ष देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
