पंडीत प्रसन्न गुडी व भार्गवी कुलकर्णी यांच्या सुश्राव्य भक्ती संगीताने धर्मसंकीर्तन महोत्सवाची सांगता.
श्री.वटवृक्ष मंदिरातल्या धर्मसंकीर्तन महोत्सव व्यासपीठावर भक्तीसंगीत सेवा सादर करताना पंडीत प्रसन्न गुडी व भार्गवी कुलकर्णी दिसत आहेत.

पंडीत प्रसन्न गुडी व भार्गवी कुलकर्णी
यांच्या सुश्राव्य भक्ती संगीताने धर्मसंकीर्तन महोत्सवाची सांगता.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.२६/०४/२५)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दिनांक १३ एप्रिल ते दिनांक २५ एप्रिल अखेर आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवाचा सांगता समारंभ धारवाड येथील पंडित भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य, पंडित माधव गुडी यांचे चिरंजीव पंडित प्रसन्न गुडी व भार्गवी कुलकर्णी यांच्या सुश्राव्य भक्ती गायनाने मोठ्या भक्ती भावात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी पंडीत प्रसन्न गुडी व भार्गवी कुलकर्णी यांचा श्री स्वामी समर्थांचे
कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. या भक्ती संगीत सेवेत पंडित प्रसन्न गुडी व भार्गवी कुलकर्णी यांनी सुश्राव्य व कर्णमधुर भाव भक्ती गीतांचे सादरीकरण करूम भाविकांची मनी जिंकली. यावेळी पंडित प्रसन्न गुडी यांनी कान्होबा तुझी घोंगडी चांगली, श्री स्वामी समर्थ, तीर्थ विठ्ठल, रूप पाहता लोचनी, अगा वैकुंठच्या राया ही गीते तर भार्गवी कुलकर्णी यांनी
भाग्यदा लक्ष्मी, मदनाचा पुतळा राजस सुकुमार, माझे माहेर पंढरी, वेडागनिता अगाध विठ्ठला इत्यादी भाव भक्तीगीते गाऊन उपस्थितांची भावभक्ती पल्लवीत करीत श्री स्वामी समर्थांच्या धर्मसंकीर्तन महोत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले तर या भक्ती संगीत सेवेत पंडित प्रसन्न गुडी व भार्गवी कुलकर्णी यांना
तबल्यावर नितीन दिवाकर, हार्मोनियमवर ओंकार पाठक, पखवाजवर ज्ञानेश्वर दुधाणे, टाळवर अक्षय सरदेशमुख यांनी उत्तम साथ संगती केली.यावेळी देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रथमेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, श्रीमुख जगदाळे प्रा.नागनाथ जेऊरे, विजयकुमार कडगंची, मनोहर देगांवकर, मयुर स्वामी, अक्षय सरदेशमुख, ओंकार पाठक, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, सैदप्पा इंगळे, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, आदीत्य गवंडी, प्रकाश कासेगांवकर, शिवपुत्र हळगोदे, ज्ञानेश्वर भोसले, विपूल जाधव, अविनाश क्षीरसागर, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, प्रा.शिवशरण अचलेर, दिपक जरिपटके, प्रसाद पाटील, श्रीशैल गवंडी, महेश मस्कले, मोहन जाधव, प्रसाद सोनार, मोहन शिंदे, बंडेराव घाटगे, नरसिंग क्षीरसागर, संजय बडवे, चंद्रकांत गवंडी, सुनिल कटारे, संतोष जमगे, खाजप्पा झंपले, महेश मस्कले आदींसह मोठया संखेने स्वामी भक्तांनी उपस्थित राहून या प्रवचन सेवा श्रवणाचा लाभ घेतला.

फोटो ओळ – श्री.वटवृक्ष मंदिरातल्या धर्मसंकीर्तन महोत्सव व्यासपीठावर
भक्तीसंगीत सेवा सादर करताना पंडीत प्रसन्न गुडी व भार्गवी कुलकर्णी दिसत आहेत.
