श्री संत शिरोमणी समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कारासाठी श्री. चंद्रकांत शिवराम पोतदार यांची निवड
पुरस्कार निवड नियुक्ती

श्री संत शिरोमणी समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कारासाठी श्री. चंद्रकांत शिवराम पोतदार यांची निवड

अकलकोट (प्रतिनिधी) – बालासाहेबांच्या शिवसेने (सिंहगड), अकलकोट, सोलापूर हक्क परिषद, पत्रकार संरक्षण संघटना व माहिती अधिकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्री संत शिरोमणी समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार – २०२५ साठी श्री. चंद्रकांत शिवराम पोतदार, रा. भुरीकवठा यांची निवड करण्यात आली आहे.


श्री. पोतदार यांनी आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. त्यांच्या समाजहितासाठीच्या सातत्यपूर्ण योगदानामुळेच त्यांची निवड अत्यंत मानाची मानली जात आहे.


हा पुरस्कार देण्याचा कार्यक्रम लवकरच नियोजित असून, या वेळी त्यांना सन्मानचिन्ह आणि निवडपत्र प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी श्री. पोतदार यांना सहकुटुंब, सहपरिवार व मित्रमंडळींसह उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.