महेश इंगळे यांचा करमाळ्यात यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मान.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी सेवेसह आरोग्य व शिक्षण विषयक कार्य इतरांना अनुकरणीय.--करमाळ्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रा.गणेश करे-पाटील यांचे मनोगत.

महेश इंगळे यांचा करमाळ्यात यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मान.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे
स्वामी सेवेसह आरोग्य व शिक्षण विषयक कार्य इतरांना अनुकरणीय.–करमाळ्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यात
प्रा.गणेश करे-पाटील यांचे मनोगत.


(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.०३/०५/२०२५)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे कार्य कौतुकास्पद असुन इतरांना अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन प्रा.गणेश करे-पाटील यांनी केले. करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे संस्थेचा पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पार पडला. या प्रसंगी महेश इंगळे यांचा प्रा.गणेश करे-पाटील यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार प्रदान करून महेश इंगळे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रा.गणेश करे-पाटील बोलत होते. याप्रसंगी सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असो.अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड, राष्ट्रीय सेवा योजनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख, कृषी पत्रकार गजेंद्र पोळ यांच्या कार्याची दखल घेऊन देवस्थानच्या वतीने महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. पुढे बोलताना प्रा.गणेश करे-पाटील यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमार्फत विविध पातळीवर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य सुरू आहे. तसेच देवस्थानच्या वतीने स्वामी भक्तांना सर्वोत्तम सुविधा मिळवून देण्यासाठीचे सेवाकार्यही व्यापक प्रमाणावर प्रगतीपथावर असून ही सेवा अतुलनीय आहे असेही मनोगत प्रा.गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बाळकृष्ण लावंड यांनी, सूत्रसंचालन प्रा.विष्णू शिंदे यांनी केले तर आभार प्रा.मारूती जाधव यांनी मानले. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त तथा करमाळ्याचे माजी सभापती प्रा.भारतराव शिंदे, नि.पोलीस उपअधिक्षक गोडगे, प्रा.गणेश करे-पाटील, सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असो.अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड, राष्ट्रीय सेवा योजनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, चंद्रकांत सोनटक्के, सुनिल पवार, स्वामीनाथ मुसळे, कृषी पत्रकार गजेन्द्र पोळ, प्रयोगशील शेतकरी प्रशांत नाईकनवरे, जीवन शिक्षण फौंडेशनचे प्रमुख प्रा.जयेश पवार, प्रा.भिष्मा चांदणे, प्रा.विष्णू शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा.सुखदेव गिलबीले, जलसंपदा अभियंता अतुल दाभाडे, सहसचिव मारूती जाधव, करमाळा तालुका इंग्लिश.टीचर्स असोसिएशन अध्यक्ष, पक्षीनिरिक्षक कल्याणराव साळुंके, प्रा. विठ्ठल रोडगे, निवृत्ती बांडे, भिवा वाघमोडे, सैनिक संघटनेचे सचिव सुभेदार बिभिषण कन्हेरे, पंचायत समितीचे समन्वयक रेवन्नाथ आदलिंग, लोक विकास प्रोड्युसर कंपनीचे संचालक व केळी निर्यातदार विष्णू पोळ, तसेच करमाळा परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळ – महेश इंगळे यांचा करमाळ्यात यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मान करताना प्रा.गणेश करे-पाटील दिसत आहेत.
