गावगाथा

सी.बी. खेडगी कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ७३.६२ : अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट विभागातील सोनाली प्रमोद पाटील हिने 510 (85 टक्के) गुण मिळवून महाविद्यालयात सर्वप्रथम

बारावी निकाल

सी.बी. खेडगी कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ७३.६२ : अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट विभागातील सोनाली प्रमोद पाटील हिने 510 (85 टक्के) गुण मिळवून महाविद्यालयात
सर्वप्रथम

अक्कलकोट, दि.५- अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी.बी. खेडगी कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ७३.६२ टक्के लागला. अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट विभागातील सोनाली प्रमोद पाटील हिने 510 (85 टक्के) गुण मिळवून महाविद्यालयात
सर्वप्रथम आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी देखील महाविद्यालयात मुलीनेच बाजी मारली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाच्या वतीने फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेसाठी खेडगी महाविद्यालयातील विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय प्रशिक्षण या चारही शाखेतून एकूण ७०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तसेच अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट मध्ये द्वितीय क्रमांक – आकाश सूर्यकांत डांबरे 473 (७८.८३ टक्के ) गुण, व पुष्पा चंद्रकीर्ती खानापुरे हिने ४४९ (७४.८३ टक्के) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविली आहे.

विज्ञान शाखेतील ३३८ पैकी ३१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९१.७१ टक्के निकाल लागला. प्रथम क्रमांक- मुझ्झम्मील महमदरफिक शेख ४६४ ( ७७.३३ टक्के) गुण, द्वितीय तृतीय- तहेझिब असलम शेख ४४३ ( ७३.८३ टक्के ) गुण, व सौंदर्या रमेश म्हेत्रे ४३२ ( ७२ टक्के) गुण याने तृतीय क्रमांक मिळवला.

वाणिज्य शाखेतून १४३ विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी ११६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८१.११ टक्के निकाल लागला. यामध्ये मुलींनी बाजी मारली प्रथम क्रमांक- सारिका श्रीनिवास बहिरेवार ४६२ ( ७७ टक्के) गुण, द्वितीय क्रमांक- रेणुका सिध्दलिंग कलशेट्टी व अश्विनी मुत्तप्पा निंबाळ ४४४ ( ७४ टक्के) गुण, प्रगती नेताजी पाटील
हिने ४४१ ( ७३.५० टक्के) गुण तृतीय क्रमांक
पटकावला.

कला शाखेतील २२८ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यातील ९६ (४२.१० टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक – स्नेहल नागनाथ बेळ्ळे ४०८ ( ६८ टक्के), द्वितीय क्रमांक- अंकिता विठ्ठल लोंढे ३९५ ( ६५.८३ टक्के) गुण, पूजा अष्टीक कांबळे ३९३ ( ६५.५० टक्के ) गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

व्यवसाय शिक्षण विभागातील ९२ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी ६२ ( ६७ टक्के)विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विभागात प्रथम क्रमांक – समर्थ गजानन सुतार ४९३ (६८.८३ टक्के) गुण, द्वितीय क्रमांक – वैभव गंगाधर सुतार ३८२ ( ६३.६७ टक्के) गुण, तृतीय क्रमांक – प्रणिता पुंडलिक सुतार ३४५ (५७.५० टक्के) गुण,

ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभागात प्रथम क्रमांक – विजय अनिल गवंडी ३१६ (५२.६७ टक्के) गुण, द्वितीय क्रमांक – सचिन श्रीशैल कोष्टी
२९३ ( ४८.९३ टक्के) गुण,
तृतीय क्रमांक – समर्थ भुताळसिद्ध मैंदर्गी २८५ ( ४७.५० टक्के) गुण,
असा निकाल लागला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सचिव सुभाष धरणे, व्हाइस चेअरमन अशोक हारकुड, प्राचार्य डॉ. शिवराय आडवितोट, उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक संजय कलशेट्टी व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदिनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button