अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; २०० निराधार व गरजूंना होणार ब्लँकटचे वाटप
अक्कलकोट, दि.6 : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी श्री दत्तजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, न्यासाने सुरु केलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेला एक वर्ष पूर्ण होत आहे. दररोज 200 निराधार, दिव्यांगांना दोन वेळचा समर्थ महाप्रसाद डबा घरपोच दिला जात आहे.
या कार्यक्रमामध्ये सकाळी 11 वा. समर्थ महाप्रसाद सेवाच्या लाभार्थ्यांना ब्लँकटचे वाटप, पालखी पादुका परिक्रमा बसचे इंटेरिअर व सिंहासन करुन सेवा रुजू केलेले श्री माळी व पाटील, देणगीदारासमवेत नैवेद्य, आरती, सत्कार याबरोबरच जयहिंद फुड व रॉबिनहुड आर्मीसह आतिष पवार, सागर पवार, टोणपे यांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. यासह अंकुश चौगुले यांचे मनोगत व्यक्त होणार आहे. ब्लँकटचे वाटप श्री माळी व पाटील यांच्या समवेत उपस्थित देणगीदार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
श्री दत्तमंदिर नव्याने साकारण्यात आलेले असून या मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांनी सजविण्यात आलेले आहे. यंदा पु.ना.गाडगीळ या सराफ पेढीने तयार केलेल्या चांदीच्या पाळण्याला देखील गुलाबाच्या फुलाने सुशोभित करण्यात येणार आहे.
धार्मिक विधी हा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी हे करणार असून दुपारी 4.30 वा.श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त वागदरी महिला भजनी मंडळाचे भजन सायं.5.50 मि.नामस्मरण, सायं.6 वा.श्री दत्तजन्म व गुलाल, पाळणा हा उत्सव न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. संकल्प व नैवेद्य आरती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व अर्पिताराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. याबरोबर सुंठवडा व प्रसाद वाटप, भजनी मंडळाचा सत्कार, मसाला दूध वाटप होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ सद्भक्तांनी घेण्याचे आवाहन न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी केले आहेत.
More Stories
Akkalkot: “न्यासाच्या” विविध विकास कामांमुळे अक्कलकोटच्या वैभवात भर -वृषालीराजे भोसले
Akkalkot: श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री जन्मेजयराजेंना दैनिक नवभारत व नवराष्ट्र यांच्या वतीने पुरस्कार जाहीर ; राज्यपालांच्या हस्ते दिला जाणार पुरस्कार
Akkalkot: वटवृक्ष मंदिरात वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा ; हजारो सुवासिनींनी मनोभावे केली स्वामींच्या वटवृक्षाची पुजा