अक्कलकोट सी.बी.खेडगी महाविद्यालयात स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६८ वी जयंती उत्साहपूर्व वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवरायआडवितोट हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणपतराव कलशेट्टी यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून जगातील राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर दुसरे एक शूर महापराक्रमी योद्धे म्हणजे राजे छत्रपती संभाजी महाराज होय. राजे संभाजी महाराज हे अधिक धाडसी शूर व महापराक्रमी स्वाभिमानी कुशल व कर्तबगार अष्टपैलू राजे होते. ते नेहमी स्वराज्य रक्षणासाठी सातत्याने संघर्ष करीत राहिले. छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य वाघा सारख होत. स्वराज्य व धर्म रक्षणासाठी सातत्याने स्वाभिमानाने लढणारे जगातील राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर दुसरे राजे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव राजे होते. म्हणून आज जगातील प्रगत देशामध्ये युद्धनीती व सशस्त्र आरमारी उभी करताना राजे छत्रपती शिवाजी महाराज व राजे संभाजी महाराज यांची युद्धनीतीचा अनुकरण करण्यात येत आहे. असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस सी आडवीतोट यांनी आपले विचार व्यक्त करताना भारतातील प्रत्येक युवकांनी स्वराज्यरक्षक राजे छत्रपती संभाजी महाराज यांच शौर्य स्वाभिमान स्वराज्यनिष्ठा कर्तबगारपणा व धाडस इत्यादी सर्व महान गुणांच अनुकरण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनातून करावेत व देशाच्या संरक्षणासाठी स्वाभिमान शौर्य एकात्मता व बंधुभाव हे गुण आत्मसात करावेत. देश संरक्षणासाठी सतत संघटितपणे जागृत राहावेत.असे मत व्यक्त केले. कार्यक्रम आयोजनासाठी हिंदी विभाग प्रमुख प्रा. विठ्ठल वाघमारे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी रसायन रसायनशास्त्र विभागातील प्रा. दयानंद कोरे व ग्रंथपाल प्रा.आर आर कांबळे आणि विद्यार्थी वाघमोडे व कांबळे तसेच विद्यार्थिनी कुमारी जकापुरे कुमारी इंगळे यांनी देखील राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत आपले विचार व्यक्त केले. महाविद्यालयीन सेवक श्री प्रशांत कडबावकर श्री धनंजय गडदे श्री समर्थ जाधव आणि सर्व मान्यवर प्राध्यापक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन इतिहास विभाग प्रमुख डॉ किशोर थोरे यांनी केले. हिंदी विभाग प्रमुख प्रा.विठ्ठल वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी यावेळी प्राध्यापक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि बहुसंख्य विद्यार्थी बंधू भगिनी उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!